खांडोळा,
लोकमान्य टिळक हे खऱ्या अर्थाने तमाम भारतीय जनतेचे जनक होते. केसरी व मराठा या वृत्तपत्राच्या खणखणीत लेखणीतून त्यांनी ब्रिटिशांना ‘सळो की पळो’ करून सोडले आणि स्वातंत्र्यलढ्याला चालना व स्फूर्ती दिली. तेव्हापासून पत्रकारिता हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात आहे, असे उद्गार कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी खांडोळा येथे माशेल युनियन ऑफ जर्नालिस्टचे विधिवत उद्घाटन करतेवेळी एका खास कार्यक्रमात बोलताना काढले.
माशेल युनियन ऑफ जर्नालिस्ट संस्थेचे उद्घाटन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते खांडोळा येथे करण्यात आले.
व्यासपीठावर बेतकी-खांडोळाचे सरपंच दिलीप नाईक, पंच राजू नाईक, मनोजकुमार घाडी, नारायण नाईक उपस्थित होते.
पत्रकार हा समाजाचा आधार असतो. समाजात ज्या अडीअडचणी व समस्या निर्माण होतात, त्याला वाचा फोडण्याचे काम हे पत्रकार खंभीरपणे वृत्तपत्रातून करतो, हे कार्य कौतुस्पद आहे, सरपंच दिलीप नाईक यांनी मांडले.
माझ्यावर विश्वास ठेवून जी जबादारी सोपवली आहे, ती मी यशस्वीपणे पार पाडणार आहे, असे अध्यक्ष नारायण नाईक यांनी व्यक्त केले.
सदस्यांना ओळखपत्र प्रदान केले.
मंत्री गावडे यांच्या हस्ते समई प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला हार घालून त्यांना मानवंदना दिली. सूत्रनिवेदन रामकृष्ण कामत यांनी केले. रामदास भगत यांनी आभार व्यक्त केले.
|