ED Raid: मोहम्मद हाफिजच्या गोव्यासह दोन राज्यातील 9 ठिकाणांवर ईडीचे छापे; कोट्यवधी रुपये, दागिने जप्त

ED Raid: ईडीकडून बँकेत जमा केलेले 4.4 कोटी रुपये, 12.5 लाखांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.
 ED
ED Dainik Gomantak
Published on
Updated on

Enforcement Directorate Raid

पीएमएलए (Prevention of Money Laundering Act, 2002) प्रकरणात ईडीने मोहम्मद हाफिजच्या कर्नाटक, केरळ आणि गोव्यातील 9 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. याशिवाय बँकेत जमा केलेले 4.4 कोटी रुपये, 12.5 लाखांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत.

छाप्यादरम्यान आरोपीच्या घरी एक वाहन सापडले असून, यावर कर्नाटक विधानसभेच्या प्रोटोकॉल स्टिकर होते. स्टिकर बंगळुरूमधील शांती नगर येथील काँग्रेस आमदार एन ए हरिस यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी जप्त केलेली कार आरोपी मोहम्मद हाफिजने वापरत होता. पण, ती आमदाराचा मुलगा मोहम्मद हरिस नालापदने खरेदी केली होती, असेही सांगण्यात येत आहे. मोहम्मद कर्नाटक युवक काँग्रेसचे सरचिटणीस असून, मोहम्मद हाफिजचा जवळचा मित्र आहे.

वाहन नफीह मोहम्मद नासेर यांच्या नावाने नोंदणीकृत आहे. नासेर आमदार एनए हरिस यांचे निकटवर्तीय आहेत आणि आमदाराचे राजकीय काम पाहतात.

 ED
Goa Congress complaint Against BJP: आचारसंहितेचा भंग; भाजपविरोधात गोवा काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

ईडीने गोवा, केरळ आणि कर्नाटकात नोंदवलेल्या प्रकरणांच्या आधारे मोहम्मद हाफिजविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. मोहम्मद हाफिजने त्याच्या साथीदारांसह पत्नीच्या कुटुंबाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप होता.

मोहम्मद हाफिजने हुंड्याच्या नावाखाली सासरच्यांकडून 108 कोटी रुपये घेतले. यानंतर, एजन्सीने 14 मार्च ते 16 मार्च या कालावधीत आरोपींच्या आवारात छापे टाकून 1672.8 ग्रॅम सोन्याचे दागिने, 7 मोबाइल फोन, 12.5 लाख रुपये रोख आणि 4.4 कोटी रुपयांची रोकड आणि बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवी जप्त केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com