Energy Week : हर घर ‘टेक्नॉलॉजी’; कंपन्यांची तयारी सुरू

Energy Week : ऊर्जा सप्ताह : विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न
Energy Week
Energy WeekDainik Gomantak
Published on
Updated on

Energy Week : बेतूल, सध्या तंत्रज्ञानाचे युग असल्याने या क्षेत्रात होणारे आविष्कार हे केवळ प्रदर्शनापुरते मर्यादित न राहता ते प्रत्येक घरात पोचविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचा विश्वास ऊर्जा सप्ताहात सहभागी झालेल्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी व्यक्त केला आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करून अत्याधुनिक उपकरणे बनविण्यात येत आहेत. अशी काही उपकरणे या सप्ताहात पाहायला मिळाली, जी नव्या पिढीसाठी आकर्षणाचे केंद्र बनतील.

त्यात विविध कंपन्यांनी तयार केलेल्या बायोगॅस शेगड्या, अत्यंत कमी ऊर्जा लागणाऱ्या स्वयंपाक घरातील इंडक्शन्स, ‘इथेनॉवर चालणारी मालवाहतूक वाहने, इ मोटारसायकल आणि इ मोटो प्लस सायकलचा समावेश आहे.

‘आयओए’ चे लवकर ‘इथेनॉल आउटलेट्स’

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेली इंडियन ऑइल लवकरच ४०० ‘इथेनॉल आउटलेट्स’ सुरू करणार आहे. पेट्रोल आणि डिझेलची मागणी कमी करून देशात ‘ग्रीन एनर्जी’वर भर देण्यासाठी कंपनीचा हा प्रयत्न आहे.

कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, ग्रीन हायड्रोजनवर चालणारी एक बस आम्ही दिल्लीत सुरु केलेली आहे. एका महिन्यात आम्ही अशा १५ बसेस चालविणार आहोत. बायोगॅसपासून ग्रीन हायड्रोजनची निर्मितीही केली जाणार आहे.

लवकरच चार राज्यात १०० टक्के इथेनॉल आउटलेटस सुरू केले जातील. ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.

पेट्रोनेट या कंपनीने ‘एलएनजी’ लिमिटेड व कतार एनर्जीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

‘प्रेस्ट्रीज’ची ऊर्जा बचाव शेगडी

या ऊर्जा सप्ताहामध्ये सर्वसामान्यांच्या खिशाचा विचार करणाऱ्या वस्तूही पाहायला मिळाल्या. त्यात सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरली ती प्रेस्ट्रीजची शेगडी. सध्या वापरात असलेल्या शेगड्या या २००० मेगाव्हॅट ऊर्जा खेचतात.

मात्र ही नवी शेगडी केवळ २०० मेगा व्हॅटवर चालणार आहे. उल्लेखनीय. म्हणजे तिची किंमतही कमी असेल. उज्ज्वला योजनेर्तंत ती गावातील महिलांपर्यंत पोचविण्याचा विचार केला जात असल्याची माहिती कंपनीचे वितरण व्यवस्थापक पाटील यांनी दिली.

Energy Week
Goa Carnival 2024: स्मार्ट सिटीच्या कामाचा कार्निव्हलप्रेमींना फटका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com