Mormugao : एमव्ही एमप्रेस पर्यटक जहाजाची वन डे गोवा ट्रिप

उद्या नौटीका पर्यटन जहाज पर्यटकांना घेऊन मूरगाव बंदरात दाखल होणार
Empress cruise
Empress cruiseDainik Gomantak
Published on
Updated on

Mormugao : मुरगाव बंदरात एमव्ही एमप्रेस हे पर्यटक जहाज 1831 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन पहाटे 6 वाजता दाखल झाले. सदर जहाज मुंबई मार्गे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाले.

2022-23 या पर्यटन हंगामातील विदेशी पर्यटक जहाज एमव्ही एमप्रेस प्रवासी 1233 व 598 कर्मचारी मिळून 1831 देशी विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले.

Empress cruise
Som Yag Yadnya 2023 Goa: महासोमयागास प्रारंभ, पहिल्या दिवशी प्रसन्नतेची अनुभूती

एमव्ही एमप्रेस पर्यटक जहाज जेएम बक्सी यांच्या प्रायोजनाखाली मुरगाव बंदरात दाखल झाले. नंतर पर्यटकांनी सर्व सोपस्कर पुर्ण करून गोवा भ्रमंतीसाठी रवाना झाले. गोव्याच्या सौंदर्यसृष्टीचा आस्वाद घेतल्यानंतर पर्यटक पुन्हा मुरगाव बंदरात दाखल होऊन जहाजात रवाना झाले.

नंतर सदर जहाज दुपारी 3.15 वाजता मुंबईला जायला रवाना झाले. यावेळी 39 पर्यटक गोव्यात ऊतरले. तर 1225 प्रवासी रवाना झाले. दरम्यान उद्या सकाळी नौटीका पर्यटन जहाज 968 पर्यटकांना घेऊन मूरगाव बंदरात दाखल होणार आहे.

Empress cruise
Mahadayi Water Dispute: अमित शहा कर्नाटक व गोव्यातील लोकांमध्ये कटुता निर्माण करत आहेत; गोवा कॉंग्रेस प्रभारी

काही दिवसांपूर्वी मुरगाव बंदरात कोस्टा डेलिझिओसा 1 हे पर्यटक जहाज 2419 विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले होते. 2023 या वर्षात मुरगाव बंदरात दाखल होणारे हे दुसरे विदेशी पर्यटक जहाज आहे.

सदर जहाज मुंबई मार्गे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाले होते. नंतर पर्यटकांनी सर्व सोपस्कर पुर्ण करून गोवा भ्रमंतीसाठी रवाना झाले. गोव्याच्या सौंदर्यसृष्टीचा आस्वाद घेतल्यानंतर पर्यटक पुन्हा मुरगाव बंदरात दाखल होऊन जहाजात रवाना झाले. नंतर सदर जहाज मालदिवजला संध्याकाळी साडेसात वाजता रवाना झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com