Mahadayi Water Dispute: अमित शहा कर्नाटक व गोव्यातील लोकांमध्ये कटुता निर्माण करत आहेत; गोवा कॉंग्रेस प्रभारी

कॉग्रेसतर्फे हात से हाथ जोडो अभियान सुरु
Manickam Tagore
Manickam TagoreDainik Gomantak
Published on
Updated on

Hath Se Hath Jodo: म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांंकडून शहा यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आलेला नाही. अमित शहा कर्नाटक व गोव्यातील लोकांमध्ये कटुता निर्माण करत आहेत अशी टिका गोवा कॉंग्रेस प्रभारी मणिकम टागोर यांनी केली आहे.

हात से हाथ जोडो अभियान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी टागोर यांनी संबोधित केले.

Manickam Tagore
Gujrat Crime News: गोळी मारून व्यापाऱ्याला 40 लाखांना लुटले; गोव्यात लपलेल्या तिघांना अटक

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्रसिंग यादव यांनी म्हाईदबाबत शास्त्रोक्त अभ्यास करून निर्णय घेऊ असे सांगितले. मग कर्नाटकच्या डीपीआरला अभ्यासाशिवाय मंजुरी का दिली? असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री यादव यांना केला.

यावेळी आलेमाव म्हणाले की, राज्यातील भाजप सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. हे सरकार केवळ इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात गुंतलेले आहे. नोकरी देण्याच्या नावाने घोटाळा केला.

सरकारने केलेला जॉब फेयर पुर्णतः फसला. हजारो बेरोजगोर तरूण तिथे गेले होते. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. म्हादईसाठी आम्ही बैठक घेतली. तो आमचा लोकशाही हक्क आहे. पण त्याची परवानगी रद्द करण्याचा प्रयत्न केला असही त्यांनी सांगितले.

Manickam Tagore
Som Yag Yadnya 2023 : विश्वकल्याणासाठी सोमयाग यज्ञ उत्सवाला सुरुवात; पहा ही खास छायाचित्रे

यावेळी बोलताना अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, गोव्याचे मुख्यमंत्री हे केंद्रीय नेतृत्वाची कठपुतली आहेत. अमित शहांच्या म्हादई वळवण्याच्या वक्तव्याचा निषेध करण्याची त्यांच्यात हिम्मत नाही.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची गमवावी लागण्याची भीती आहे. म्हणूनच त्यांनी कुडचडेमधील आपल्या बाहुल्याला अमित शहांच्या विधानाचा निषेध करण्यास सांगितले. भाजप गोवावासियांचे हित जपण्यात अपयशी ठरले आहे अशी टिका पाटकर यांनी सरकारवर केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com