राज्यातील रोजगाराच्या समस्या लवकरच सोडवू: विश्वजित राणे

पर्ये मतदार संघात (Parye Constituency) येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रातील विविध प्रभागात झंझावात दौरा करून, घेतलेल्या बैठकीतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
Health Minister Vishwajit Pratap Singh Rane
Health Minister Vishwajit Pratap Singh RaneDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई (Walpai) मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित प्रतापसिंह राणे (Health Minister Vishwajit Pratap Singh Rane) यांनी पर्ये मतदार संघात (Parye Constituency) येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रातील विविध प्रभागात झंझावात दौरा करून, घेतलेल्या बैठकीतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तर येणाऱ्या काही दिवसात सुशिक्षित युवक युवतींना भेडसावणाऱ्या रोजगाराची समस्या सोडविण्या बरोबर मतदार संघातील प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सदर दौऱ्यात आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी होंडा आजोबा नगर, भुईपाल धनगरवाडा, गावकर वाडा या प्रभागात बैठका घेतल्या, यावेळी त्यांच्या सोबत होंडा सरपंच आत्मा गावकर, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, पंच पांडुरंग गावकर, सया पावणे, विनोद शिंदे, धनगर समाजाचे अध्यक्ष बि डी मोटे आदी उपस्थित होते.

Health Minister Vishwajit Pratap Singh Rane
Goa Election: कुंकळ्ळी मतदारसंघात इच्छुकांची भावूगर्दी

यावेळी आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी कोव्हीड काळात ओढवलेल्या प्रसंगाची माहिती देऊन, त्यावर सरकार व आरोग्य खात्याने केलेल्या कामाचा आढावा घेतला, राज्य सरकारने सामान्य जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र काम करून जीवन वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे, त्याच प्रमाणे आरोग्य खात्याच्या वतीने कोव्हीड प्रतिबंध लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) यशस्वीरीत्या राबवली असल्याचे सांगितले. गेल्या काही वर्षांपासून रोजगाराची समस्या वाढली असून या संबंधी सरकारने नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे, याचा लाभ या भागातील सुशिक्षित युवा युवतींनी घ्यावा असे आवाहन शेवटी राणे यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com