खाणपट्ट्यात होतेय सुशिक्षित युवकांची परवड!

सरकारी नोकरीनंतर आता खासगीतही संधी नसल्याने पालकांमध्ये नाराजी
Mining Belt in Goa
Mining Belt in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : राज्यातील खाण उत्खनन बंद पडून दहा वर्षे सरली तरी अजून खाणी काही सुरू होत नाहीत. परिणामी खाणपट्ट्यातील रहिवाशांची अर्थात खाण अवलंबितांची दुर्दशा होत असून त्यांनी पोटाला चिमटा देऊन मुलांना उच्च शिक्षण दिले तरी अजून हे विद्यार्थी रोजगारासाठी चाचपडत आहेत. एकप्रकारे खाण भागात उच्चशिक्षित विद्यार्थ्यांची परवडच चालल्याचं चित्र आहे.

Mining Belt in Goa
बागा किनाऱ्यावरील वाळू खचल्याने व्यावसायिक चिंतेत

राज्यातील सर्वांत मोठा खनिज खाणींचा उद्योग दोन वेळा बंद पडला. सुरवातीला 2012 आणि त्यानंतर 2018 मध्ये या खाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद पडल्या. मात्र, अजूनही कायदेशीर मार्गाने या खाणी सुरू झालेल्या नाहीत. खाणबंदीचे अनेक परिणाम खाण अवलंबितांना भोगावे लागले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही (Education) याचा विपरित परिणाम झाला आहे.

खाण उद्योग गेली सत्तर वर्षे राज्यात चालत आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारला भरभक्कम महसूल मिळूनही खाण भाग समृद्ध झाला नाही. होंडा, पाळी, वेळगे, उसगाव, धारबांदोडा, सावर्डे, सांगे, डिचोली हा खाणपट्टा विकासाच्या प्रतीक्षेतच आहे. सरकारने (Goa Government) विविध खात्यांत सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या, पण येथील उच्चशिक्षित युवकांना संधीच मिळाली नाही असा आरोप होताना दिसतोय.

Mining Belt in Goa
निवडणुकीत आश्वासनं देणाऱ्या उमेदवारांची मोपा आंदोलनाकडे पाठ

खाण (Mining) पट्ट्यातील बऱ्याच हुशार मुलांनी उच्च शिक्षण घेतले आहे. काहींनी अभियांत्रिकीची पदवीही घेतली आहे. या उच्च शिक्षणासाठी या मुलांच्या पालकांनी लाखो रुपये खर्च केले, पण त्याचा काहीच लाभ झालेला नाही. सरकारने रोजगाराबाबत खाणपट्ट्यातील उच्च शिक्षित मुलांचा विचारच केला नाही. आता नवीन सरकार कुणाचेही येवो, पण या उच्च शिक्षित मुलांचा प्राधान्याने विचार व्हावा, अशा अपेक्षा खाण पट्ट्यातील सर्वच पालकांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com