Sanguem News: उल्लेखनीय कामगिरीबद्दल निवडणूक कर्मचाऱ्यांचा सन्मान!

Sanguem: मामलेदारांकडून कौतुक; साळजिणीत १०० टक्के मतदानाची कामगिरी
Sanguem: मामलेदारांकडून कौतुक; साळजिणीत १०० टक्के मतदानाची कामगिरी
Sanguem Election Procedure Staff Dainik Gomantak

सांगेच्या निवडणूक कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नात नेत्रावळीतील साळकजिणीसारख्या भागात शंभर टक्के मतदान होऊ शकले. शिवाय ज्या भागात साठ, सत्तर टक्के मतदान होत असे त्या ठिकाणी नव्वद टक्के मतदान झाले.

या प्रयत्नातून निवडणूक यंत्रणा पुढे जात आहे त्यांच्या कार्याची नोंद घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांचा गौरव करणे योग्य असल्याचे सांगेचे निवडणूक प्रमुख म्हणून कार्य केलेले मामलेदार प्रवीण गावस यांनी सांगितले.

सांगे नगरपालिका सभागृहात निवडूक यंत्रणेत सहभागी झालेल्या मतदान केंद्र प्रमुख आणि मामलेदार कार्यालयातील निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानीत केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जितेंद्र बुगडे, कृष्णा वेळीप, यतीन नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यतीन नाईक यांनी केले.

मामलेदार प्रवीण गावस पुढे म्हणाले, की चांगला कर्मचारी वर्ग मिळाल्यामुळे शंभर टक्के मतदान करणे शक्य झाले. त्यापूर्वी मतदान करण्यासाठी चांगल्या पद्धतीने जनजागृती करण्यात आली होती. अशा सर्व सहकाऱ्यांना सन्मानित करून प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न आहे.

यावेळी दक्षिण गोवा निवडणूक यंत्रणा हाताळणारे जितेंद्र बुगडे म्हणाले, की चांगला कर्मचारी वर्ग मिळाल्यास कोणतेही काम पुढे नेणे शक्य होत असते. याबद्दल मामलेदार प्रवीण गावस व सर्व सहकऱ्यांचे अभिनंदन केले.

Sanguem: मामलेदारांकडून कौतुक; साळजिणीत १०० टक्के मतदानाची कामगिरी
Sanguem News: सांगेत भरपावसात टँकरद्वारे पाणी; लोक संतप्‍त

मतदान केंद्र प्रमुखांचाही गौरव

यावेळी सर्वाधिक मतदान झालेल्या प्रथम तीन मतदान केंद्र प्रमुखांना खास भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी रणजित चिपळुणकर, प्रकाश गावकर यांनी काम करताना मामलेदार प्रवीण गावस यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे चांगले काम करण्यास आनंद मिळाल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com