कंठ दाटला, डोळे भरुन आले! रामा काणकोणकरांना 24 दिवसांनी डिस्चार्ज, व्हिलचेअरवरुन आले बाहेर Watch Video

Rama Kankonkar Assault Case: रामा काणकोणकर यांच्या झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे राज्यासह देशातही पडसाद उमटले होते.
Rama Kankonkar attack case |
Rama Kankonkar dischargedDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकरांना अखेर २४ दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. हल्ल्यानंतर त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. रामा व्हिलचेअरवरुन रुग्णालयातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार हजर होता. रामा यांच्यावर पाच ते सहा जणांनी १८ सप्टेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता.

रामा काणकोणकर बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला व डोळ्यात अश्रु तरळले. यानंतर त्यांनी या कठीण प्रसंगात सोबत उभं राहिलेल्या सर्वांचे आभार मानले.

काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे राज्यासह देशातही पडसाद उमटले होते. राज्यात विरोधी पक्षातील नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्यावरुन निषेध नोंदवला होता. तसेच, मास्टरमाईंडला शोधून त्याच्या अटकेची मागणी केली होती.

Rama Kankonkar attack case |
गोव्यात 'आप'च्या सलमान खान यांचा राजीनामा; कार्यकारी अध्यक्षानंतर 'युवा' उपाध्यक्षनेही पक्षाची साथ सोडली

रामा यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु होते. सुरुवातील रामा पोलिसांना जबाब देण्याच्या स्थितीत नव्हते. तब्येत थोडी बरी झाल्यानंतर अखेर त्यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला होता.

पोलिसांनी याप्रकरणात कुख्यात गुंड जेनिटो कार्दोझ याच्यासह इतरांना अटक केली आहे. शुक्रवारी पणजी न्यायालयाने जेनिटोसह इतर संशयित आरोपींना १८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संशयित अटकेत असले तरी अद्याप या प्रकरणाच्या मागे मास्टरमाईंड कोण आहे? याची माहिती समोर आलेली नाही. रामा काणकोणकर यांच्या हल्ल्यामागे राजकीय संबंध असल्याचा आरोप देखील विरोधकांकडून केला जात आहे. या घटनेचा एसआयटी मार्फत तपास करण्याची मागणी रामा यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे होणार नाही अशी शंका त्यांनी उपस्थित केलीय. दरम्यान, या घटनेवरुन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलडमली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com