Goa High Court Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची संधी, पगार 19000 ते 63200; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता, वयाची अट काय?

Bombay High Court Goa Bench Clerk Recruitment: गोवा खंडपीठात कारकुनांंची १७ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
bombay high court goa bench recruitment 2024, Goa Government Job
bombay high court goa bench recruitment 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Bombay High Court Goa Bench Clerk Recruitment 2024

पणजी: गोव्यातील रहिवाशांसाठी नोकरीची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कारकुनांंची १७ पदे भरण्यासाठी जाहिरात जारी करण्यात आली आहे, मात्र यामध्ये असलेली एक महत्वाची अट असे सांगते की शैक्षणिक पात्रता असून देखील जर का अर्जदाराला दोनपेक्षा अधिक मुलं असतील तर तो या पदासाठी अर्ज करू शकणार नाही.

वय आणि शिक्षणाची अट काय आहे? Age Education for clerk position

ही जाहिरात गोवा खंडपीठाच्या वेबसाईटवर पाहायला मिळते. या पदांसाठी १८ ते ४५ अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून एससी किंवा एसटीसाठी हीच मर्यादा ५० वर्षांपर्यंत जाते. अर्ज करणारा माणूस हा पदवीधर असावा, त्याला टायपिंगचं ज्ञान असणं गरजेचं आहे. याशिवाय कोंकणी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे, मराठी भाषा येत असल्यास उत्तम अशी मागणी केली गेली आहे.

bombay high court goa bench recruitment 2024, Goa Government Job
Goa High Court: 'भ्रष्टाचारा'संदर्भात विशेष न्यायालयाचा आदेश गोवा खंडपीठाकडून रद्दबातल; नव्याने सुनावणी घेण्याचा आदेश

अर्जदारांचे अर्ज तपासून झाल्यानंतर लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली जाईल आणि यानंतरच पदांवर भरती होणार आहे.

मात्र या पदांसाठी स्पष्टपणे दोनपेक्षा अधिक मुले असतील तर ती व्यक्ती कारकुन पदासाठी अपात्र ठरेल असे नमूद करण्यात आले आहे. एखाद्या जोडप्याला जर का एक मुल असेल आणि दुसऱ्या प्रसूतीच्यावेळी एकपेक्षा अधिक मुलाचा जन्म झाल्यास त्याची गणना एकच मुल अशी करण्यात येईल, पण ही अट २८ मार्च २००५ पर्यंंत जन्म झालेल्या मुलांसाठीच लागू होते, २००६ पासून जन्मलेल्या मुलांसाठी ही सवलत दिली जाणार नाही.

bombay high court goa bench recruitment 2024, Goa Government Job
Konkan Railway: कोकण रेल्वे महामंडळ विलीनीकरण! गोव्याचा होकार; महाराष्ट्र, कर्नाटक, केरळची संमती बाकी

अर्ज भरताना काय लक्षात ठेवावे?

उमेदवारांनी अर्ज केवळ विहित नमुन्यातच सादर करणे आवश्यक आहे. अर्ज डाऊनलोड करून त्यांची प्रिंट काढून अर्जदाराने स्वतःच्या हस्ताक्षरात फक्त निळ्या शाईने भरावा. अर्जासोबत तीन रंगीत पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र जोडावेत. त्यापैकी एक छायाचित्र अर्जावर चिकटवावे आणि हस्ताक्षराचा काही भाग छायाचित्रावर आणि उर्वरित भाग अर्जावर अशा पद्धतीने स्वाक्षरी करावी.

जाहिरातीची सविस्तर माहिती वाचा:

Attachment
PDF
Detailed advt. for the post of Clerk-2024
Preview

अर्ज कुठे पाठवावा आणि शेवटची तारीख काय आहे? (Last Date Of Application, Where to submit form)

उमेदवारांनी अर्ज Registrar (Administration), Bombay High Court, Goa - 403 525 या पत्त्यावर पाठवावेत. R.P.A.D. or Speed Post ने पाठवलेले अर्जच स्वीकारले जातील आणि लिफाफ्यावर Application for the post of Clerk असा स्पष्ट उल्लेख करावा. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२४ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com