Electric Vehicles : लोकांना ई-वाहनांची भुरळ! इंधन दरवाढीचा परिणाम

Electric Vehicles : बार्देशात 3 वर्षांत 3879 वाहनांची नोंद
Electric Vehicles
Electric VehiclesDainik Gomantak
Published on
Updated on

योगेश मिराशी

Electric Vehicles : म्हापसा, इंधन दरवाढ ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. त्यामुळे अलीकडे नवी वाहने खरेदी करताना ई-वाहनांना (इलेक्ट्रिक वाहने) प्राधान्य देण्‍यात येत असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. बार्देश तालुक्‍यात तर ही संख्‍या खूप मोठी आहे.

१ जानेवारी २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एकूण ३८७९ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद म्हापशातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. यात दुचाकी ३४२८ व चारचाकी ३९४ वाहनांचा समावेश आहे.

सरकार पर्यावरणपूरक असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य देण्याबाबत लोकांना प्रोत्साहन करत असले तरी चार्जिंग केंद्रांचा सध्या अभाव आहे. त्यामुळे जागोजागी तसेच शहरांमध्ये चार्जिंगचे जाळे उभारण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन लोकांना ते अधिक सुलभ व सोयीस्कर होईल. ही चार्जिंग केंद्र अधिकतर हॉटेल्स किंवा विसावा असणाऱ्या ठिकाणी असावीत. कारण पेट्रोलपंपसारख्या ठिकाणी तासभर रांगेत उभे राहणे लोकांना परवडणारे नाही.

सध्या लोक इलेक्ट्रिक दुचाकींना प्राधान्य देत आहे. कारण इंधन दरवाढीमुळे पेट्रोलचे दर सर्वांनाच परवडणारे नाहीत. शिवाय वाहतूक कोंडीमध्ये ताटकळत रहावे लागत असल्याने पेट्रोल जास्त जळते. त्यामुळे ई-वाहने ही आर्थिकदृष्ट्या थोडी उजवी ठरतात. जरी चार्जिंग स्टेशनची संख्या किंवा चार्जिंगचे जाळे नसले तरी ही वाहने घरीही चार्जिंग करता येतात. सरकारला वाहतूक वाहन सुविधा सुधारायची असल्यास जास्तीत जास्त चार्जिंग केंद्र उभारणे काळाची गरज बनली आहे.

सुरूवातीला इलेक्ट्रिक वाहने खरेदीबाबत लोकांमध्ये निरुत्साह दिसायचा. मात्र, या वाहनांमधील आधुनिक वैशिष्ट्ये आता वाहनचालकांना भुरळ घालू लागली आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांना जास्त सर्व्हिसिंग करावे लागत नाही. शिवाय सरकारकडून ई-वाहने खरेदी करण्‍यासाठी करातून सवलत दिली जाते.

मध्यंतरी राज्य सरकारने ई-वाहन खरेदीवरील अनुदान निधी योजना सुरू केली होती. मात्र गेल्या वर्षी ऑगस्टपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे ई-वाहन खरेदीवर परिणाम होणार असल्याची भीती व्यावसायिकांच्या मनात होती. परंतु, ही भीती खोटी ठरली आहे.

मालवाहतूक करणाऱ्या तीनचाकी टेम्पो तसचे ई-रिक्षांनाही मागणी वाढत आहे. २०२१ पासून आतापर्यंत गुड्स करिअरसाठी १२ वाहनांची नोंदणी झाली आहे. ई-रिक्षासाठी ६, थ्री व्हिलर (गुड्स) २, थ्री व्हिलर (पॅसेंजर) ४, थ्री व्हिलर (पर्सनल) १ वाहनांची नोंदणी झालेली आहे. हा इलेक्ट्रिक वाहन नोंदणीचा आकडा सरासरी वर्षाला एक हजारपर्यंत जात असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या आकडेवारीवरून इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी वाढत असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. मागील तीन वर्षांत ३८७९ ई-वाहने नोंदणी झालेली आहेत.

इलेक्ट्रिक वाहन खरेदीवेळी मिळते करातून सवलत

पूर्वीच्या तुलनेत सध्या इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे नागरिकांचा कल वाढलाय. ही वाहने पर्यावरणपूरक असल्याने लोक इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देताहेत.

तसेच छोट्या पल्यासाठी किंवा बाजारहाटसाठी ही वाहने फायदेशीर ठरत आहेत. शिवाय ई-वाहनांना करातून सूट मिळते. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून आम्ही खूष आहोत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

२०२१ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत बार्देशात खरेदी केलेली वाहने

बसेस : ३२

ई-रिक्षा व्हिथ कार्ट (जी) : ६

गुड्स करिअर : १२

मोटरसायकल/दुचाकी : ३४२८

मोटरकार : ३९४

थ्री व्हिलर (गुड्स) : २

थ्री व्हिलर (पॅसेंजर) : ४

थ्री व्हिलर (पर्सनल) : १

Electric Vehicles
Electric Bike Taxi in Delhi: दिल्लीत सुरु होणार इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवा, केजरीवाल सरकारचा निर्णय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com