KTC Electric Buses: ‘म्हजी बस’ सेवेसोबत कदंबाही सुरु राहणार; गोव्यातील सगळ्या रस्त्यांवर लवकरच इलेक्ट्रिक बसेस धावणार

CM on Electric Buses: राज्यातील सर्व मार्गांवर ‘म्हजी बस’ योजनेबरोबरच कदंबाची बस सेवा सुरू राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली
CM on Electric Buses: राज्यातील सर्व मार्गांवर ‘म्हजी बस’ योजनेबरोबरच कदंबची बस सेवा सुरू राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली
KTC Electric Buses GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Electric Kadamba Transport In Goa

पणजी, ता. १२ (प्रतिनिधी) : कदंब वाहतूक महामंडळाच्या माध्यमातून विजेवरील बससेवा राज्यातील सर्व मार्गांवर देण्यात येणार असून ‘म्हजी बस’ योजनेबरोबरच कदंबची बस सेवा सुरूच राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कदंब बस टर्मिनस, पणजी येथे कदंब वाहतूक महामंडळ लिमिटेडच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन नवीन कदंब बसचे मुख्यमंत्र्यांनी उद्‌घाटन केले.

डॉ. सावंत यांनी आपल्या भाषणात कदंब महामंडळाच्या टीमचे अभिनंदन केले, लोकसेवेसाठी महामंडळाची बांधीलकी व्यक्त केली. त्यांनी कदंब महामंडळ विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात ५० टक्के सवलत देते, तर कर्करोगग्रस्त, एचआयव्ही रुग्ण आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्यांना कदंब बसमधून प्रवास करताना मोफत वाहतुकीचा लाभ घेता येतो, असे त्यांनी सांगितले.

बसेसच्या कमतरतेमुळे कदंबला कोल्हापूर, पुणे, बंगळुरू आणि बेळगाव यासारख्या लांब पल्ल्याचे, फायदेशीर मार्ग बंद करावे लागल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तथापि, हा निर्णय जनतेच्या फायद्यासाठी असून तोट्यात असतानाही छोट्या मार्गांवर सेवा देण्याचे महामंडळाची समर्पित सेवा दाखवून देते.

कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर म्हणाले, चालक, वाहक आणि मेकॅनिकसह कदंब परिवार गेल्या ४४ वर्षांपासून पेडणे ते काणकोण तालुक्यातील जनतेची सेवा करत आहे. बसेसचा तुटवडा आणि बसस्थानकांची सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, परंतु सरकारकडून सातत्याने मिळणाऱ्या मदतीचे कौतुक केले.

तुयेकर यांनी नियमांमुळे ५० वर्षांहून अधिक जुन्या सुमारे १०० बसेस रद्द कराव्या लागल्या, त्यामुळे १०० मार्गांवर तुटवडा निर्माण झाला. ५० नवीन बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आणि ही उणीव भरून काढण्यासाठी दरवर्षी आणखी ५० बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यांनी १५० इलेक्ट्रिक बसेसपैकी कदंबला ८७ प्राप्त झाल्या आहेत, उर्वरित ४३ बसेस डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहेत, असे सांगितले.

CM on Electric Buses: राज्यातील सर्व मार्गांवर ‘म्हजी बस’ योजनेबरोबरच कदंबची बस सेवा सुरू राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली
MLA Disqualification Petition: आठ आमदार 'अपात्र' ठरवले तर काय? भाजपच्या गोटात अस्वस्थता; सभापतींकडून सुनावणीस वेग

कदंब महामंडळाचे महाव्यवस्थापक नारायण नाईक यांनी स्वागत केले. याप्रसंगी कदंबचे उपाध्यक्ष कृतेश नाईक गावकर, व्यवस्थापकीय संचालक पुंडलिक खोर्जुवेकर, संचालक मंडळ उज्ज्वला नाईक, मधुकला शिरोडकर, बायो भंडारी व कदंबचे कर्मचारी उपस्थित होते.

१५० विजेवरील बसेस आम्हाला मिळणार होत्‍या व त्यातील ८३ मिळाल्या आहेत. उरलेल्या बसेस आम्हाला लवकरात लवकर सरकारने द्यावा, अशी मागणी कार्यक्रमादरम्यान कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी केली. ते म्हणाले कि, स्मार्ट सिटीतर्फे ४८ बसेस आम्हांला मिळाल्या असून त्या शहरात लोकांना सेवा देत आहेत. विद्यमान परिस्थितीत २५० बसेसची आम्हांला गरज आहे.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या आगामी पवित्र शवदर्शन सोहळ्यासाठी सुमारे २० नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली, ज्यामुळे या कार्यक्रमादरम्यान लोकांच्या सेवेत मदत होईल,

असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी वाहतूक नियंत्रक, चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांसह कदंबच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याशिवाय, शालान्त आणि उच्च माध्यमिकमध्ये उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार केला.

कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत सुरू केलेली कदंब इलेक्ट्रिक बस सेवा जनतेला उत्कृष्ट सेवा देत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने ही सेवा संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याची सरकारची योजना आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी लांब पल्ल्याच्या प्रवाशांनी सार्वजनिक वाहतूक अधिक वेळा वापरण्याचा विचार करण्याचे आवाहन केले. त्यामुळे रस्ते अपघातांच्या घटना कमी होण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

पगारावर ९ कोटी खर्च

उल्हास तुयेकर यांनी सांगितले कि, कदंब कर्मचारी सुमारे दोन हजार आहेत आणि त्यांना पगार देण्यात सरकार आम्हांला प्रति महिना ९ कोटी रुपये देतात. कदंब सेवा नुकसानीत आहे तरी देखील आम्ही लोकांना सेवा देतो. सकाळी आणि संध्याकाळी कदंबामध्ये ग्राहक असतात परंतु मधल्यावेळी ग्राहक केवळ चार किंवा पाच असतात. तरीदेखील आम्ही ते ठरावीक मार्ग बंद कारण्याचा विचार करत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com