Mormugao News : मुरगाव उपनगराध्यक्षपद निवडणुकीची रंगत वाढली; आज फैसला

रामचंद्र कामत, विनोद किनळेकर यांचा अर्ज
Mormugao Municipalityl |Mahadayi Water Dispute
Mormugao Municipalityl |Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

मुरगाव नगरपालिकेच्या मंगळवारी होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मुरगावातून नगरसेवक रामचंद्र कामत तर दाबोळीतून नगरसेवक विनोद किनळेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही नगरसेवक भाजप गटातील असल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे.

मुरगाव पालिकेत रिक्त उपनगराध्यक्षपदासाठी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात निवडणूक होणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी मुरगाव भाजप समर्थक व माजी मंत्री मिलिंद नाईक यांचे खंदे समर्थक नगरसेवक रामचंद्र कामत यांनी अर्ज सादर केला. कामत यांच्यातर्फे पाच अर्ज तर किनळेकर यांच्यातर्फे दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे.

Mormugao Municipalityl |Mahadayi Water Dispute
Canacona Accident: व्होल्वो बसची दुचाकीला जोरदार धडक; चापोलीतील पती-पत्नीचा दुर्दैवी अंत...

कामत यांचे नाव पूर्वीच या पदासाठी जाहीर झाल्यने निवडणूक बिनविरोध होणार असे वाटत होते. परंतु प्रभाग 22 चे नगरसेवक विनोद किनळेकर यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून मुरगाव तालुक्याचे उप जिल्हाधिकारी भगवंत करमली उपस्थित राहतील, असे मुख्याधिकारी जयंत तारी यांनी सांगितले.

आमदारांचा पाठिंबा, तरीही...

कामत यांना 14 नगरसेवकांबरोबर दोन अपक्षांचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. तर किनळेकर यांना पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचे समर्थन असनूही विजयासाठी आवश्‍यक संख्याबळ नसल्याचे समजते. यामुळे मुरगाव, वास्को, दाबोळी भाजप समर्थक नगरसेवकात बंड होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

Mormugao Municipalityl |Mahadayi Water Dispute
Ponda Muncipal Council Election 2023: प्रभाग 12 मध्‍ये तिरंगी लढतीचे संकेत; गाठीभेटी सुरू

नगरसेवकांमध्ये बंडाची शक्यता

मुरगाव प्रभाग 7 चे नगरसेवक कामत यांना उपनगराध्यक्ष पदासाठी माजी मंत्री मिलिंद नाईक, वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या समर्थक नगरसेवकांचा पाठिंबा असल्याने कामत यांचा विजय निश्चित आहे.

नगरसेवक किनळेकर यांना 13 आकडा प्राप्त करण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे. यामुळे भविष्यात मुरगाव, वास्को, दाबोळी भाजप समर्थक नगरसेवकांत बंडाची शक्यता दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com