सरपंच व उपसरपंच पदासाठी कुठ्ठाळी येथे निवडणूक पार पडली

कुठ्ठाळी पंचायत सरपंच एडुसियाना रॉड्रिग्स तर उपसरपंचपदी प्रताप नाईक यांची बिनविरोध निवड
Election for the post of Sarpanch and Deputy Sarpanch was held at Cortalim
Election for the post of Sarpanch and Deputy Sarpanch was held at CortalimDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: कुठ्ठाळी पंचायत सरपंच एडुसियाना रॉड्रिग्स तर उपसरपंचपदी प्रताप नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. कुठ्ठाळी पंचायतीच्या सरपंच सेनिया परेरा व उपसरपंच सांतानो डा गामा यांच्याविरोधात सात पंच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. वास्कोतील (Vasco) गटविकास अधिकारी कार्यालयात सदर ठराव दाखल करण्यात आला होता.(Election for the post of Sarpanch and Deputy Sarpanch was held at Cortalim)

Election for the post of Sarpanch and Deputy Sarpanch was held at Cortalim
HSSC पर्यंत कोकणी भाषा अनिवार्य करण्याची कोकणी भाषा मंडळाची मागणी

कुठ्ठाळीच्या सरपंच (Sarpancha) सेनिया परेरा व उपसरपंच सांतानो डा गामा यांनी आपल्या कार्यकाळात कुठ्ठाळी (Cortalim Panchayt) पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता आपला मनमानी कारभार चालवत होते. तसेच कुठ्ठाळी पंचायत क्षेत्रात विकास कामे करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे कारण पुढे करून पंच सदस्य आंतोनिओ फर्नांडिस, फ्रान्सिस्को मेंडीस, अँजेला फुर्तादो, प्रताप नाईक, आगोस्तीनो मिनेझिस, येडोसियानो रॉड्रीगीस व रेमंड डिसा यांनी आज गटविकास अधिकारी कार्यालयात सदर अविश्वास ठरावाची प्रत दाखल केली होती.नंतर या अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बैठक बोलावली होती.बैठकी दरम्यान अविश्वास ठरावावर शिक्कामोर्तब केले होते.

दरम्यान आज सरपंच व उपसरपंच पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीत कुठ्ठाळी पंचायतीच्या सरपंचपदी एडुसियाना रॉड्रिग्स यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसरपंचपदी प्रताप नाईक यांची निवड करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com