Lok Sabha Election: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर दक्षिण गोव्यात निवडणूक नियंत्रण कक्ष कार्यरत

Lok Sabha Election: दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष स्‍थापन केलेला असून हा कक्ष चोवीस तास कार्यरत असेल असे कळविण्‍यात आले आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Election:

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष स्‍थापन केलेला असून हा कक्ष चोवीस तास कार्यरत असेल असे कळविण्‍यात आले आहे. वेगवेगळ्‍या तालुक्‍यांसाठी वेगवेगळे फोन क्रमांक ठेवण्‍यात आले असून निवडणुकीसंबंधी कोणतीही तक्रार संबंधित विधानसभा मतदारसंघ आणि तालुक्यांसाठी खालील क्रमांकावर नोंदविता येईल.

फोंडा, शिरोडा आणि मडकई विधानसभा मतदारसंघासाठी फोंडा तालुका 2312121/ 8766563700 येथे नियंत्रण कक्ष; मुरगाव तालुका मुरगाव, दाबोळी आणि कुठ्ठाळी विधानसभा मतदारसंघासाठी नियंत्रण कक्ष 2513014 / 8793043014; नुवे, कुडतरी, फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळी आणि वेळ्ळी विधानसभा मतदारसंघासाठी सासष्ठी तालुका 2794100/ 9307205769 येथे नियंत्रण कक्ष. जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर हाच नियंत्रण कक्ष दक्षिण गोवा जिल्ह्यासाठीही असेल;

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election: गोव्यात येणाऱ्या वाहनात तब्बल 10 लाखांची सापडली रोकड; फोंडाघाट चेकनाक्यावर केली तापसणी

केपे आणि कुडचडे विधानसभा मतदारसंघासाठी केपे तालुका नियंत्रण कक्ष 2662228/ 9588427336; धारबांदोडा तालुका येथील सांवर्डे विधानसभा मतदारसंघ नियंत्रण कक्ष 2614111/ 9356894541; सांगे विधानसभा मतदारसंघासाठी सांगे तालुका नियंत्रण कक्ष 2604232/ 7822069067; काणकोण विधानसभा मतदारसंघासाठी काणकोण तालुका नियंत्रण कक्ष 2643329/ 9529050351 वर नमूद केलेले लँडलाइन, मोबाइल आणि व्हॉट्सॲप क्र. संबंधित विधानसभा मतदारसंघ आणि तालुक्यांसाठी आहेत. तसेच 1950 हा टोल फ्री क्रमांक राज्य पातळीवर कार्यरत असेल असे जिल्‍हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Election Ticket
Women Reservation
Central Govt Notification Goa ST Seats Reservation
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com