गोव्यात निवडणूक आयोगाची 80 भरारी पथके सक्रिय

निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदार संघासाठी 2 अशा पद्धतीने 80 भरारी पथक सक्रिय केले आहेत.
Election Commission's squads active in Goa
Election Commission's squads active in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेले निर्बंध आणि मार्गदर्शक तत्त्वांचा काटेकोर पालन पालन व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदार संघासाठी 2 अशा पद्धतीने 80 भरारी पथक सक्रिय केले आहेत. या भरारी पथकांनी मतदारसंघांमध्ये कारवाईला सुरुवात केली असून अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स काढून टाकले आहेत. यापुढे ही पथके निवडणुकांमधील (Election) गैरव्यवहार टाळण्यासाठी अधिक सक्रिय होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली आहे. (Election Commission's squads active in Goa in the light of Assembly Election)

Election Commission's squads active in Goa
पहिल्यांदाच मनोहर पर्रीकरांच्या चेहऱ्याशिवाय भाजप मैदानात, काय आहे तयारी?

विधानसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात निर्भय, शांततेत आणि विश्वासाच्या वातावरणात व्हावेत यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आयोगाने पोलिसांच्या (Police) मदतीने भरारी पथकांची नियुक्ती केली आहेत. याशिवाय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केंद्रीय पथके राज्यात दाखल होतील. ही भरारी पथके प्रामुख्याने उमेदवारांकडून पैसे वाटप, अवैद्य दारू विक्री - वाटप, प्रचार सभा, प्रचार सभांमधील आश्वासने आणि नेत्यांची भाषणे यांच्यावर करडी नजर ठेवतील. पूर्वीप्रमाणे यावेळीही प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होऊन प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर सर्व जाहीर सभा, प्रचार सभा आणि प्रचार यांचे चित्रीकरण करण्यात येईल. यासाठी केंद्रीय भरारी पथके दिवस-रात्र सक्रिय असतील.

Election Commission's squads active in Goa
लोबो यांचा काँग्रेसच्या प्रचारामध्ये सहभाग; भाजपला जाहीर आव्हान

1950 वर तक्रार नोंद करा

निवडणुकीच्या संदर्भात कोणतीही गैरप्रकार आढळल्यास 1950 या क्रमांकावर कोणीही तक्रार नोंद करू शकते. तातडीने त्याची दखल घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) निवडणुका जाहीर करताना पोलिस दलात मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल केले आहेत. यामध्ये 18 उपाधीक्षक यांच्या नव्या ठिकाणी बदल्या केल्या असून 39 पोलिस निरीक्षकांनाही वेगळ्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com