Sudin Dhavalikar: ज्येष्ठांनी समाजात चांगल्या गोष्टी रूजवाव्यात

Sudin Dhavalikar: ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन विचारांची देवाणघेवाण करून समाजात चांगल्या गोष्टी रूजवाव्यात व आपला आदर्श नव्या पिढीला देऊन सुदृढ समाजाच्या जडणघडणीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak

Sudin Dhavalikar: ज्येष्ठ नागरिकांनी एकत्रित येऊन विचारांची देवाणघेवाण करून समाजात चांगल्या गोष्टी रूजवाव्यात व आपला आदर्श नव्या पिढीला देऊन सुदृढ समाजाच्या जडणघडणीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

Sudin Dhavalikar
GIDC: ‘इन्व्हेस्ट गोवा 2024’ला प्रतिसाद !

रविवारी बांदोडा फोंडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर प्रोबस क्लब ऑफ फोंडा हिलटाऊन, प्रोबस ट्रस्ट व माधवराव ढवळीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फोंडा तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठीचा वार्षिक क्रीडामहोत्सव तथा स्नेहमेळावाच्या उद्‍घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ढवळीकर बोलत होते.

व्यासपीठावर गोवा इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य डाॅ.कृपाशंकर दास,निवृत्त आरोग्याधिकारी डाॅ.नूतन देव,निवृत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सिव्हिल विभागाचे प्रमुख श्रीपाद शेल्डरकर जिल्हापंचायत सदस्य गणपत नाईक,पंचसदस्य वामन नाईक, प्रोबस क्लबचे अध्यक्ष बाबलो पारकर ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे आदी उपस्थित होते.

ढवळीकर म्हणाले ,ज्येष्ठ नागरिकांनी आपले आरोग्य तंदुरुस्त राहाण्यासाठी नियमित व्यायाम करण्यावर भर द्यावा.यावेळी डाॅ.नूतन देव यांनी सांगितले की आपण जीवंत असे पर्यंत शरीराची हालचाली चालू असाव्यात, नियमित मैदानावर चार फेऱ्या मारून अंग मोकळे करावे.डाॅ.कृपाशंकर दास व प्रो.श्रीपाद शेल्डरकर यांनीही आपले विचार मांडून ज्येष्ठ नागरिकांच्या या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

सुरवातीस माजी अध्यक्ष जयवंत आडपईकर यांनी प्रास्ताविक केले.ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर तिळवे यांनी क्लब संबधी माहिती दिली.प्रेमानंद पार्सेकर यांनी प्रार्थना शिकविली,यशवंत तळावलीकर यांनी प्रोबसच्या नियमानुसार अध्यक्षांना काॅलर परिधान केला. सूत्रसंचालन कृष्णनाथ शेट तळावलीकर यांनी केले. राम परिहार यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com