बराच वेळ फोन लागत नसल्यामुळे डुप्लीकेट चावीने फ्लॅट उघडला अन् धक्कादायक प्रकार आला समोर!

Goa Crime: ६४ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न; मालमत्तेच्या वादातून कृत्य केल्याचा संशय
Goa Crime: ६४ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न; मालमत्तेच्या वादातून कृत्य केल्याचा संशय
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Murder Case

म्हापसा: नायकावाडा-कळंगुट येथे एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये करासवाडा-म्हापसा येथील एका ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. तिचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने कळंगुट पोलिसांनी हे प्रकरण खून म्हणून नोंदविले आहे. दिओदिता फर्नांडिस असे या मृत महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना गुरुवारी मध्यरात्री १.३०च्या सुमारास उघडकीस आली. दिओदिता फर्नांडिस या गुरुवारी दुपारी नायकावाडा-कळंगुट येथील बेन्सन नामक इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमध्ये आल्या होत्या. या फ्लॅटचे नूतनीकरण तसेच रंगकाम त्यांनी सुरू केले होते. मृतदेहाची उद्या (शनिवारी) उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दिओदिता या कर्करोगग्रस्त होत्या, असेही सूत्रांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच कळंगुटचे पोलिस निरीक्षक परेश नाईक, उपनिरीक्षक परेश सिनारी, उपनिरीक्षक किरण नाईक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठविला.

दरम्यान, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही वास्को येथे एका ज्येष्ठ महिलेची चोरीच्या उद्देशाने निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता कळंगुट येथेही असाच प्रकार घडल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे क्रमप्राप्त झाले आहे.

डुप्लीकेट चावीने फ्लॅट उघडला अन्...

दिओदिता गुरुवारी रात्री उशिरापर्यंत घरी परतल्या नाहीत. तसेच फोनही लागत नसल्यामुळे त्यांच्या बहिणीने फ्लॅटच्या केअर टेकरना याची माहिती दिली. रात्री उशिरा ते फ्लॅटवर पोहोचले, तेव्हा दरवाजाला कुलूप लावलेले दिसले. त्यांनी डुप्लीकेट चावीने फ्लॅट उघडला असता, दिओदिता या डायनिंग हॉलमध्ये मृतावस्थेत पडलेल्या आढळल्या. इमारतीमधील लोकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

Goa Crime: ६४ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न; मालमत्तेच्या वादातून कृत्य केल्याचा संशय
Goa Crime: गोव्यातील चेन स्नॅचिंगच्या २५ प्रकरणांमधला Most Wanted गुन्हेगार फिरत होता गोकर्णमध्ये, असा पोलिसांच्या तावडीत सापडला

संशयितांची ओळख पटविली

घटनास्थळावरून मृत महिलेची पर्स आणि मोबाईल गायब झाला होता. तसेच फ्लॅटला बाहेरून कुलूप लावले होते. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा, हा पोलिसांचा संशय बळावला. मालमत्तेच्या वादातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासचक्रे फिरवत काही संशयितांची ओळख पटविली असून ते सध्या फरार आहेत. या महिलेचा गळा आवळल्याची स्पष्ट खूण दिसते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com