Suleman Khan: 'ईदसाठी नवे कपडे हवेत'! सुलेमानची मागणी न्यायालयाने फेटाळली; सर्वाधिकार कारागार महानिरीक्षकांकडे असल्याचे स्पष्ट

Suleman Khan Case: ‘ईद’ निमित्त कपडे आणि धार्मिक वस्तू मागवण्याची परवानगी मिळावी, यासाठी सुलेमान खानने केलेला अर्ज मेरशी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला.
Suleman Khan Case
Suleman Khan CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘ईद’ निमित्त बाहेरून वैयक्तिक कपडे आणि धार्मिक वस्तू मागवण्याची परवानगी मिळावी, यासाठी सुलेमान खानने केलेला अर्ज मेरशी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. याप्रकारचे आदेश देण्याचे अधिकार न्यायालयाला नसून, याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार कारागार महानिरीक्षकांकडे (आयजीपी) असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले.

कोलवाळ येथील कारागृहात असलेला आरोपी सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खानने न्यायालयात अर्ज सादर केला होता. आगामी ईद साजरे करण्यासाठी त्याला बाहेरून दोन कुर्ते-पायजमा संच, दोन प्रार्थना टोप्या, एक तसबीह (माळ) आणि चप्पल मिळवण्याची मागणी त्याने अर्जाद्वारे केली होती.

गोवा कारागृह नियम २०२१ नुसार या वस्तूंची परवानगी असून, आपल्या धार्मिक श्रद्धेनुसार सण साजरा करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे त्याने अर्जात म्हटले होते. संशयितातर्फे युक्तिवाद केला की, कारागृह नियमावलीनुसार कैद्यांना अशा वस्तू वापरण्याची मुभा आहे.

Suleman Khan Case
Suleman Khan: कोठडीतून पलायन प्रकरण! कॉन्स्टेबलसहित सुलेमान खानवर आरोप निश्चित

मात्र, सरकारी वकिलांनी या अर्जाला विरोध करत, अशी मागणी कायद्याच्या कक्षेबाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. कोलवाळ कारागृह अधीक्षकांनी सादर केलेल्या उत्तरात नमूद केले की, कारागृहात सर्व सण साजरे केले जातात.

Suleman Khan Case
Suleman Khan: आईच्या धार्मिक विधीसाठी केलेला सुटकेचा अर्ज सुलेमान खानकडून मागे; ठोस कारण देण्यात ठरला असमर्थ

रमझाननिमित्त उपवास करणाऱ्या मुस्लिम कैद्यांसाठी कारागृहाच्या मेसमध्ये जेवणाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, धार्मिक कारणांसाठी अतिरिक्त कपडे देण्याची कोणतीही तरतूद नियमावलीत नसल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

bombay high court goa bench
Bombay High Court Goa Bench Judgment
Ponda By Election Cancelled
Supreme Court Verdict on Bastard Word
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com