ईद मुबारक: गोव्यात उत्‍साह शिगेला

नमाज पठण: धर्मगुरुंनी दिला सर्वधर्म समभावाचा संदेश
EID in Goa
EID in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यात मुस्‍लिम बांधवांनी रमजान ईद उत्‍सव उत्‍साहात साजरा केला. राजधानी पणजीसह मडगाव, म्‍हापसा, फोंडा, वाळपई, वास्‍को आदी शहरांसह उपनगरांमधील मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली. प्रमुख शहरांतील जामा मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. तसेच इतर मशिदींमध्ये आणि ग्रामीण भागांतील वाड्यावाड्यांवरही मुस्‍लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पढला.

संपूर्ण जगात एकाच दिवशी आणि एकाच वेळी ईद-उल-फित्र म्‍हणजेच रमजान ईद साजरी केली जात आहे. ही अनन्‍यसाधारण घटना असून यापूर्वी असे घडल्‍याचे माझ्या ऐकिवात नाही. जगभरातील मुस्‍लिम राष्ट्रांसह अन्‍य सर्व देशांमध्‍ये एकाचवेळी रमजान ईद साजरी होत असल्‍याची माहिती म्‍हापसा जामा मशिदीचे सरचिटणीस हाजी महम्मद मोतीवाला यांनी दिली. माझ्या सर्व गोमंतकीय हिंदू, ख्रिश्‍चन, शिख आणि इतर समाजातील बंधू-भगिनींना रमजान ईदच्‍या शुभेच्‍छा. सामाजिक शांती आणि सलोखा, ही गोव्‍याची संस्‍कृती आणि ओळख आहे. ती आपण कायम जपूया. एकमेकांच्‍या सणांचा, देवकार्याचा आदर ठेवून गुण्यागोविदांने राहूया, असे आवाहन त्‍यांनी केले.

EID in Goa
बेरोजगारीत गोवा पाचव्या क्रमांकावर!

म्‍हापसा जामा मशिदीचे मौलाना अल अहमद सुभानी म्‍हणाले, रमजानचा महिना अत्‍यंत पवित्र समजला जातो. संपूर्ण महिनाभर आम्‍ही कडक उपवास करतो. यालाच रोजा म्‍हणतात. चंद्रदर्शन झाल्‍यानंतर रोजे सोडले जातात. सुख, समाधान आणि शांतता हा ईश्‍वराचा संदेश आहे. सध्या देशात आणि राज्‍यातही सामाजिक शांती भंग करण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत.

सामाजिक एकोपा आणि गुण्यागोविंदाने राहणारे आम्‍ही गोमंतकीय अशा गोष्टींना कधीही बळी पडणार नाही. धर्म कोणताही असू द्या, आपापल्‍या देवावर श्रद्धा असणारा सामाजिक शांती बिघडवू देणार नाही. सर्व गोमंतकीय बंधू-भगिनींना रमजान ईदच्‍या खूप साऱ्या शुभेच्‍छा. तर, मशिदीचे अध्यक्ष काटवालिया म्‍हणाले, म्‍हापसा शहरासह परिसरातील मुस्‍लिम बांधवांनी येथे एकत्र येऊन नमाज अदा केला. एकमेकांना शुभेच्‍छा देत अबालवृद्धांसह सर्वांनी रमजान ईद आनंदात आणि उत्‍साहात साजरा केला. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव टिकवून गोमंतकीय संस्‍कृतीचे जतन करूया, असे आवाहन त्‍यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com