Egg Rate : अंडी खाताहेत भाव ; डझनामागे 10 रुपयांची वाढ

Egg Rate : 80 ते 90 रु. डझन मासेमारी बंदी काळापासून महाग झालेल्या अंड्यांचे दर अजून उतरलेले नाहीत. उलट बॉयलर अंड्यांचा भाव वाढतच आहे.
Egg Rate
Egg RateDainik Gomantak
Published on
Updated on

Egg Rate : डिचोली, एका बाजूने मासळी महाग झाली असताना दुसऱ्या बाजूने अंडी ही भाव खाऊ लागली आहेत. मासेमारी बंदी काळापासून महाग झालेल्या अंड्यांचे दर अजून उतरलेले नाहीत. उलट बॉयलर अंड्यांचा भाव वाढतच आहे.

गेल्या महिन्याच्या तुलनेत बॉयलर अंडी सध्या डझनामागे दहा रुपयांनी वाढलेली आहेत. आणखी काही दिवस अंड्यांचे दर चढते राहण्याची शक्यता आहे.

जून महिन्यापासून बॉयलर अंड्यांच्या घाऊक दरात वाढ झाली आहे. शंभर अंड्यांमागे ५६५ रुपये अशी वाढ झाली होती. मध्यंतरी श्रावण महिन्यात काही दिवस ''अंडी'' काही प्रमाणात स्वस्त झाली होती.

मात्र श्रावण महिना संपताच अंड्यांचा पुन्हा भाव वाढला. डिचोली बाजारात बॉयलर अंडी उपलब्ध होत आहेत, त्यात कर्नाटक राज्यातून अंडी मोठ्या प्रमाणात आयात होतात. डिचोलीत बॉयलर अंड्यांची आवक समाधानकारक असली तरी दर मात्र चढेच आहे. सध्या शंभर नगामागे ६०० रुपये असे अंड्यांचे दर झाले आहेत. किरकोळ ८० रुपये डझन विक्री होत आहे. काही ग्रामीण भागात तर ९० रुपये डझन याप्रमाणे बॉयलर अंडी विकण्यात येत आहेत.

Egg Rate
Egg Protein Hair Mask आता घरच्याघरी बनवा सिल्की केस

गावठी अंडीही महाग

दरम्यान, गावठी अंडी महाग झाली आहेत. डिचोली बाजारात क्वचितच गावठी अंडी विक्रीस उपलब्ध होतात. सध्या २५० रुपये डझन याप्रमाणे गावठी अंडी विकण्यात येत आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com