Goa: केळशी ते वार्का समुद्र किनारा स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न जारी

केळशी (Kelshi ) ते वार्का (Varca) पर्यंतचा अंदाजे 8 किलोमिटर अंतराचा समुद्र किनाऱ्यावर (beach) गेल्या काही दिवसांपासुन कचऱ्याचा मोठा ढिग झाला आहे.
 समुद्र किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासुन कचऱ्याचा लागलेला ढीग
समुद्र किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासुन कचऱ्याचा लागलेला ढीग Dainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा - केळशी (Kelshi ) ते वार्का (Varca) पर्यंतचा अंदाजे 8 किलोमिटर अंतराचा समुद्र किनाऱ्यावर (beach) गेल्या काही दिवसांपासुन कचऱ्याचा मोठा ढिग झाला आहे. समुद्राच्या लाटांबरोबर हा कचरा कुठून तरी इथे आला व तो सांचला असल्याचे केळशीचे सरपंच ऑल्विन जॉर्ज (Alvin George) यानी सांगितले. येथून हा कचरा उचलण्यासाठी स्थानिक युवकांनी जोरदार प्रयत्न केले. अंदाजे 200 बॅगा कचरा भरुन ठेवला आहे. मात्र तो हलविण्यासाठी त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही. शिवाय आणखी पुष्कळ कचरा किनारपट्टीवर साचला आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant), पर्यंटन मंत्री मनोहर आजगावकर (Manohar Ajgaonkar), यांना सोशल मिडियावरून हा कचरा उचलण्यासाठी पर्यंटन खात्यातर्फे मनुष्यबळ पाठवावे अशी विनंती केली.(Efforts continue to clean the beach from Kelshi to Varca)

 समुद्र किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांपासुन कचऱ्याचा लागलेला ढीग
Goa : सावंत सरकार म्हणजे 'दुर्गंधी युक्त कचरा यार्ड' कॉंग्रेस प्रवक्त्यांचं वक्तव्य

या विनंतीची पर्यटन मंत्र्यांनी दखल घेत आपला ओएसडी नेल्सन, पर्यटन खात्याचा अधिकारी व ज्या कंपनीला समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे त्या कंपनीचा प्रतिनिधी येथे येऊन त्यांनी संपुर्ण पाहणी केली व मदतीचे आश्र्वासन दिल्याचे सरपंच जॉर्ज यांनी सांगितले.आम्ही पंचायतीमार्फत हे किनारे स्वच्छ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जॉर्ज यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com