Scholarship
Scholarship

Scholarship: खाण कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्ती, कुठे कराल ऑनलाईन अर्ज?

केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते.
Published on

Scholarship: गोवा, दीव-दमण, महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील खाण कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सहाय्यता शिष्यवृत्तीसाठी शैक्षणिक वर्ष 2023-24 अर्ज मागविण्यात आले आहेत.

विडी कामगार, चुना आणि डोलोमाईट, लोह-मँगनीज खाणीतील कामगारांच्या पाल्यांसाठी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते.

कोणाला किती शिष्यवृत्ती?

पहिली ते चौथी - एक हजार रुपये

पाचवी ते आठवी - दीड हजार रुपये

नववी ते दहावी - दोन हजार रुपये

अकरावी ते बारावी - तीन हजार रुपये

आयटीआय, पॉलिटेक्निक, बीएस्सी कृषीसह इतर पदवी- सहा हजार रुपये

बी.ई, एमबीबीएस, एमबीएसाठी - पंचवीस हजार रुपये

Scholarship
Pernem Zoning Plan: पेडणेचा झोनिंग प्‍लॅन स्थगित : नगरनियोजनमंत्री राणे

कुठे कराल अर्ज ?

शिष्यवृत्तीसाठी scholarships.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवरती नोंदणी सुरु झाली आहे. पूर्व मेट्रीक अर्जासाठी 30 नोव्हेंबर आणि दहावीनंतरच्या अभ्यासक्रमासाठी 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

शिष्यवृत्ती आणि अर्जाबाबत अधिक माहितीसाठी 0712-2510200 या क्रमांकावर किंवा wcngp-labour@nic.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com