स्थानिक एकही मूल शाळेविना नसल्याचा शिक्षण संचालकांचा दावा! 'ती' 81 मुले परप्रांतीय मजुरांची

Shailesh Zingde Education Director Goa: गोवा राज्य हे शिक्षणाच्या अनुषंगाने एक प्रगत राज्य आहे. आमच्याकडील दिव्यांग मुलेही शाळेत जातात, त्यामुळे राज्यातील स्थानिक असलेल्यांचे एकही मूल शाळेविना नसल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.
school enrollment in goa
Goa StudentsDainik Gomantak
Published on
Updated on

State Achieves Universal School Enrollment, Says Education Director

पणजी: राज्यात शाळेविना असलेल्या ज्या ८१ मुलांची नोंद करण्यात आलेली आहे, ती परप्रांतीय मजुरांची मुले आहेत, जे सातत्याने कामानिमित्त स्थलांतर करत असतात.

गोवा राज्य हे शिक्षणाच्या अनुषंगाने एक प्रगत राज्य आहे. आमच्याकडील दिव्यांग मुलेही शाळेत जातात, त्यामुळे राज्यातील स्थानिक असलेल्यांचे एकही मूल शाळेविना नसल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

झिंगडे म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रबंध पोर्टलवर राज्यात ६ ते १४ या वयोगटातील कोणी मुले शाळेविना आहेत का याची माहिती दर चार महिन्यांनी अपलोड करावी लागते व या शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी प्रयत्न केले जातात. गेल्या वर्षी शाळेत न जाणारी ९१ मुले सापडली होती. त्यातील २८ मुले सापडली, इतर मुले परप्रांतीय मजुरांची असल्याने ती आपल्या गावी परतल्याचे त्यांनी सांगितले.

school enrollment in goa
Goa Tourism: विदेशी पर्यटकांची गोव्‍याऐवजी श्रीलंकेला पसंती! वाढीव व्‍हिसा शुल्‍काचा परिणाम; रशियन पर्यटकांचे मात्र प्राधान्‍य

सरकारकडून प्रयत्न

जी मुले शाळेत जात नाहीत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येतात. राज्यातील एकही मुल शाळेविना राहू नये याची काळजी घेण्यात येते. आम्ही समग्र शिक्षाकडून राज्यातील सर्व कंत्राटदारांना सूचना केल्या आहेत की, आपल्याकडे असणाऱ्या मजुरांची एकही मुल शाळेविना नाही असे प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यामुळे आम्ही शाळेत मुले जावीत यासाठी योग्य ती काळजी घेत आहोत असे शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com