PM Modi Goa Visit: बारा वाजेपर्यंत महाविद्यालये बंद करुन विद्यार्थ्यांना मोदींच्या सभेला पाठवा; गोवा शिक्षण खाते

मडगावातील सर्व महाविद्यालये 12 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहेत.
PM Modi Goa Visit
PM Modi Goa Visit
Published on: 
Updated on: 

PM Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.06) एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मडगावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता मडगावातील सर्व महाविद्यालये 12 वाजेपर्यंत बंद करण्याचे आदेश शिक्षण विभागाने जारी केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर येत आहेत. मोदी या दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार असून, मडगाव येथील जाहीर सभेला ते संबोधित देखील करतील.

मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सहा फेब्रुवारी रोजी मडगावमधील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

त्यानंतर आता मडगावमधील महाविद्यालये बारा वाजेपर्यंत बंद करुन विद्यार्थ्यांना केटीसी बस स्थानक येथे आयोजित मोदींच्या सभेला पाठवा, असे आदेशात म्हटले आहे. तसेच, विद्यार्थ्यांना सभास्थळी असलेल्या भोजनाचा देखील आस्वाद घेता येईल असेही नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मडगावातील सभेला किमान 50 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक असताना मोदींची होणारी ही सभा राजकीय नसल्याचा उल्लेख देखील सावंत यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Narendra Modi 25 years in government
Modi Cabinet Reshuffle 2026
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Modi government political challenge
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com