Goa Education: शिक्षण खात्याचा 'सावळा गोंधळ' सुरूच

Goa Education: शिक्षक नसल्याने भागशिक्षण अधिकाऱ्यांनाच अध्यापनाचे काम करावे लागले.
School
School Dainik Gomantak

Sanguem: वालकिणी शाळेत शिक्षक नसल्याचा मोठा गाजावाजा झाल्याने शिक्षण खात्याने तेथे कुमारी शाळेतील शिक्षिकेची बदली केली. तर कुमारी शाळेत भाटी शाळेतील शिक्षिकेला तोंडी आदेशाने पाठविले. मात्र, या सर्व गोंधळात कुमारी शाळेतच शिक्षिकाच रुजू झाली नाही.

मात्र, पाहणीसाठी गेलेल्या सांगेच्या भागशिक्षण अधिकाऱ्यांनाच अध्यापनाचे काम करावे लागले. आठवड्यात दुसऱ्यांदा झालेल्या या गलथान कारभारामुळे शिक्षण विभागात चालले तरी काय? असा सवाल पालकांमधून विचारला जात आहे.

School
Goa School Education : शालेय शिक्षण निर्देशांकात गोवा मागेच

सांगे तालुक्यातील शिक्षण खात्यातील शिक्षकांचे बिघडलेले गणित अद्याप जुळत नसल्याचे दिसत आहे. उगे पंचायत क्षेत्रातील वालकिणी वसाहत क्रमांक एकमधील सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने एका सुशिक्षित तरुणाने दहा दिवस विद्यार्थ्यांना शिकविले. या गंभीर प्रकाराने दै.‘गोमन्तक’ने लक्ष वेधल्यानंतर शिक्षण विभागाने तत्काळ पावले उचलत कुमारी भाटी गावात असलेल्या कुमारी शाळेतील शिक्षिकेची वालकिणी शाळेत बदली केली.

तसेच, ही शिक्षिका तिकडे रुजू झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून भाटी शाळेतील शिक्षिकेला कुमारी शाळेत पाठविण्यात आले. मात्र, कोणताही लेखी आदेश नसल्याने भाटीमधील त्या शिक्षिकेने 16 पटसंख्या असलेल्या कुमारी शाळेत रुजू होण्यास असमर्थता दर्शविली.

School
Sadanand Tanavade : नावेली पाठोपाठ कुडतरी सर करण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी

सुशिक्षित तरुणाने दहा दिवस विद्यार्थ्यांना शिकविले. या गंभीर प्रकाराने दै.‘गोमन्तक’ने लक्ष वेधल्यानंतर शिक्षण विभागाने तत्काळ पावले उचलत कुमारी भाटी गावात असलेल्या कुमारी शाळेतील शिक्षिकेची वालकिणी शाळेत बदली केली. ही शिक्षिका तिकडे रुजू झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून भाटी शाळेतील शिक्षिकेला कुमारी शाळेत पाठविण्यात आले. मात्र, कोणताही लेखी आदेश नसल्याने भाटीमधील त्या शिक्षिकेने 16 पटसंख्या असलेल्या कुमारी शाळेत रुजू होण्यास असमर्थता दर्शविली.

अडीच तास सांभाळले मुलांना: भागशिक्षण अधिकारी सीताराम नाईक यांनी भाटीतील शिक्षिकेला कुमारी शाळेत जाण्याचे सांगितले होते. मात्र, शुक्रवारी ती न गेल्याने शाळा बंद राहिली. रविवारनंतर आज सोमवारी संबंधित शिक्षिका शाळेत रुजू झाली की नाही हे पाहण्यासाठी नाईक हे सकाळी कुमारी शाळेत हजर झाले. पण ठरल्यानुसार शिक्षिका न आल्याने नाईक यांना अडीच तास मुलांना सांभाळावे लागले.

School
Navratri Festival : मुरगाव तालुक्यात आजपासून नवरात्रोत्सवाची धूम

सीताराम नाईक, भागशिक्षण अधिकारी-

वालकिणीतील शाळेवर कुमारी येथील शिक्षिकेला पाठविले. तात्पुरता उपाय म्हणून भाटी येथील शिक्षिकेला कुमारी शाळेत रुजू होण्यास सांगितले होते. मात्र, भाटी शाळेतील शिक्षक आणि तेथील पालकांनी लेखी आदेश नसल्याचे सांगत असमर्थता व्यक्त केली. याची सविस्तर माहिती शिक्षण संचालकांना दिली आहे.

रुपेश गावकर, माजी पंचायत सदस्य-

कुमारी शाळेत शिक्षक नसल्याची तक्रार पालकांनी केली होती. याबाबत शाळेत गेलो असता भागशिक्षणअधिकारी मुलांना शिकवत असल्याचे दिसून आले. लेखी आदेश नसल्याने शिक्षिका आली नसल्याचे समजून आले. हा गोंधळ शिक्षणमंत्र्यांनी सोडवावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com