Goa Ssc Hsc Exam: दहावी, बारावी परीक्षा तारखा जाहीर

कोविड महामारीनंतर गोवा बोर्डाने तयार केलेल्या धोरणानुसार होणार परीक्षा
Goa SSC Exam Result
Goa SSC Exam ResultDainik Gomantak

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) दहावी आणि बारावीच्या पहिल्या सहामाही परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 2021 मध्ये कोविड प्रभावाने प्रत्येक पेपरसाठी दीड तास विद्यार्थ्यांना मिळाला होता. यंदा होणाऱ्या पेपरसाठी मात्र विद्यार्थ्यांना नेमका कीती वेळ मिळणार आहे, याबात अद्याप पुरेशी माहिती समोर आली नाही. असे असले तरी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ह्या दोन सत्रांत होणार आहेत. हे निश्चित झाले आहे.

(Education Board GBSHSE announced the dates for first terminal examination of class 10 and class 12)

Goa SSC Exam Result
Zilla Panchayat Election: दवर्लीतून अपक्षाची माघार; एकूण 15 उमेदवार रिंगणात

मिळालेल्या माहितीनुसार गोवा शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षा तारखा जाहीर केल्या असून प्रथम सत्रातील परीक्षा वर्षाअखेरीस 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षा गोवा बोर्डाने आखलेल्या परीक्षा धोरणानुसार, आयोजित केल्या जाणार आहेत.

प्रथम सत्रातील परीक्षेत, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे केले जाणार आहे, तर दुसऱ्या सत्र परीक्षेत व्यक्तिनिष्ठ प्रश्नांवर आधारित मूल्यांकन केले जाणार आहे. यानंतर शालेय अंतर्गत गुणांसह दोन्ही मुदतीच्या परीक्षांचे गुण विद्यार्थ्याच्या अंतिम एकूण गुण दिले जाणार आहेत.

Goa SSC Exam Result
अर्जुन वेळीप यांच्या आव्हान अर्जावर 29 नोव्हेंबरला सुनावणी

भाषेच्या पेपरने होणार सुरुवात

दहावीच्या प्रथम सत्रातील परीक्षांमध्ये भाषेच्या पेपरने आरंभ होत. इंग्रजी, मराठी आणि उर्दू पेपरने सुरू होईल आणि CWSN श्रेणीसाठी, कार्यात्मक इंग्रजी आणि कार्यात्मक मराठी पेपर, त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी तृतीय भाषेचा पेपर होईल.

तसेच भूगोल आणि इतिहास या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 1 मार्च 2023 पासून सुरू होतील. परिपत्रकानुसार इयत्ता बारावी (सामान्य) आणि व्यावसायिक प्रात्यक्षिक परीक्षा 1 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होतील आणि NSQF विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 7 फेब्रुवारीपासून सुरू होतील. तर बारावीची प्रथम सत्रातील परीक्षा 23 नोव्हेंबरला संपेल, तर दहावीच्या प्रथम सत्रातील परीक्षा 29 नोव्हेंबरला संपेल.

2021 मध्ये कोविड प्रभावाने प्रत्येक पेपर दीड तासाचा

कोविड महामारीच्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने गोवा शालांत मंडळाने (Goa Education Board) पहिल्यांदाच 10 वी 12 वीच्या सहामाहीच्या दोन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्या होत्या. तसेच प्रत्येक विषयाच्या परीक्षेचा पेपर दीड तास केला होता. गत वर्षी दहावीची पहिल्या सहामाहीची परीक्षा 1 डिसेंबर 2021 व दुसरी सहामाहीची 4 एप्रिल 2022 पार पडली होती. तसेच बारावीची पहिली सहामाही परीक्षा 8 डिसेंबर 2021 व दुसरी 18 मार्च 2022 पार पडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com