Ed Sheeran ला गोव्याच्या किनाऱ्यावर सुचलं गाणं, तिथंच गायलं अन् जगप्रसिद्ध झालं; I Found My Lost Phone ची अनटोल्ड स्टोरी

ED Sheeran Goa Song: एड शिरन हा जगप्रसिद्ध इंग्लिश गायक आणि गीतकार आहे. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने आपल्या गीतांचा पहिला अल्बम स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला.
ED Sheeran Goa Connection
ED Sheeran Goa SongDainik Gomantak
Published on
Updated on

एड शिरन हा जगप्रसिद्ध इंग्लिश गायक आणि गीतकार आहे. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने आपल्या गीतांचा पहिला अल्बम स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला आणि त्यानंतर तो यशाच्या पायऱ्या चढतच गेला. त्याच्याबद्दलची एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे २०१५ पासून त्याने फोन वापरणे सोडून दिले आहे. ई-मेलसाठी तो फक्त टॅबलेट वापरतो.  

अलीकडच्या काळात त्याचे 'ओल्ड फोन' (जुना फोन) हे गाणे खूप गाजते आहे. 'आज मला माझा जुना फोन एका बॉक्समध्ये सापडला, जो मी लपवून ठेवला होता. आता माझा नॉस्ताल्जिया मला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित माझ्या जुन्या चुका मी पुन्हा करीन....' अशा अर्थाचे हे इंग्रजी गाणे (I found my old phone today....) युट्युबवर उपलब्ध आहे. 

‘ओल्ड फोन’ या गाण्याच्या व्हिडिओ निर्मितीबद्दलचा एक 'बिहाइंड द सीन' व्हिडिओही एड शिरनने युट्युबवर टाकला आहे ज्यात तो हे गाणे कसे बनले याबद्दल आपल्या चाहत्यांना माहिती देत आहे. या गाण्याबद्दलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गीत त्याने गोव्यात तो विश्रांतीसाठी आला असताना लिहिले आहे. तीन मिनिटे आणि ४८ सेकंदाच्या या ‘बिहाइंड द सीन’ क्लिपमध्ये तो गिटार घेऊन गाणे म्हणताना आणि ते आपल्या संदर्भासाठी रेकॉर्ड करताना दिसत आहे. त्याच्या त्या उत्कट सर्जनशील क्षणांमध्ये तो प्रसन्नही दिसत आहे. 

१ मे २०२५ या दिवशी एड शिरनने आपले ओल्ड फोन हे गाणे युट्युबवर प्रकाशित केले. हे गाणे आतापर्यंत ४३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. दशकांपूर्वी हरवलेला आपला जुना फोन सापडल्यानंतर तो सैरभैर झाला आहे.  विसरून गेलेले त्यातील अनेक संदेश, त्यातील जुने फोटो आणि स्मृती त्याला व्याकुळ करत आहेत यासंबंधीचे ते गीत आहे.

ED Sheeran Goa Connection
Costao Movie: चर्चिलचा वाढदिवस, केनेडीचे लग्‍न अन् आल्‍वेर्नाझचा मृत्‍यू! ‘कॉस्‍तांव’ सिनेमामुळे 34 वर्षांपूर्वीच्‍या घटनांना उजाळा

 एका वेगळ्या टाईम झोनमधली जादुई शांत वेळ संगीतात कशी रूपांतरीत झाली याबद्दल इंस्टाग्रामवर तो पुढील शब्दात लिहितो, ' भारतात माझा अल्बम पूर्ण करत असताना मी ओल्ड फोन हे गाणे लिहिले. ते अपघाताने आले. मी जेट लॅगमध्ये होतो आणि रात्री दोन वाजता मला जाग आली. बाकी सारे झोपले होते. जेव्हा सारे उठले तेव्हा त्याच दिवशी आम्ही ते रेकॉर्ड केले. तिथल्या समुद्र किनाऱ्यावर मी ते एकट्याने गायले देखील. जा तुम्ही देखील तुमचा जुना फोन शोधा आणि जुने फोनसाऊंड असलेले फोटो (इन्स्टावर) टाका. मलाही टॅग करा जेणेकरून मी तो पाहू शकेन. मला तुमचा शुद्ध नॉस्ताल्जिया पाहायचा आहे.

ED Sheeran Goa Connection
Golden Globe Awards 2025: फ्रेंच फिल्म Emilia Perez चा दबदबा! टीव्ही शो 'शोगुन' ने ही मारली बाजी; वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

१६ मार्च २०२४ या दिवशी त्यांच्या 'मॅथेमॅटिक्स' टूर मालिकेच्या निमित्ताने मुंबईत एड शिरनचा कॉन्सर्ट झाला होता. या कार्यक्रमाच्या सुंदर आठवणींबरोबरच तो गोव्यात तयार झालेले एक सुंदर गाणे घेऊन आपल्या देशात रवाना झाला. गोव्याच्या मातीत काहीतरी आहे असे म्हणतात ते खोटे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com