ED in Goa: मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात 'ईडी'ची गोव्यात कारवाई; वाधवान बंधुंची 31.50 कोटींची मालमत्ता जप्त

खासदार संजय राऊत या प्रकरणात संशयित आरोपी
ED seized property in Goa
ED seized property in Goa Dainik Gomantak

ED in Goa Patra Chawl Case: महाराष्ट्रातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात सोमवारी सक्तवसुली संचलनालयाने गोव्यातील 31.50 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली.

ही मालमत्ता गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीच्या नावावर असून ही कंपनी राकेश वाधवान आणि सारंगकुमार वाधवान यांची आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत या प्रकरणात संशयित आरोपी आहेत. या प्रकरणात राऊत यांना तुरूंगातही जावे लागले होते.

ED seized property in Goa
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांत घट; जाणून घ्या आजचे दर...

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्पाची पुनर्विकासाची जबाबदारी वाधवान यांच्या कंपनीकडे होती. यात एकूण 672 भाडेकरू होते.

करारानुसार 672 भाडेकरूंना सदनिका, म्हाडासाठी काही सदनिका आणि उर्वरीत सदनिकांची विक्री असे ठरले होते.

पण कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 विकसकांना एफअसआय विकला आणि 900 कोटींची कमाई केली. तसेच भाडेकरूंना सदनिका दिल्या नाहीत. याशिवाय बेकादेशीर कामांतून संचालकांनी एक हजार कोटी कमावल्याचा ईडीचा आरोप आहे.

ED seized property in Goa
Virdi Dam Dispute : विर्डी धरणाचे काम थांबवा; गोव्‍याची महाराष्ट्राला नोटीस

2011 ते 2016 या काळात राकेश वाधवान यांच्या खात्यातील 38.5 कोटी रूपये इंडिया बुल्स फायनान्सच्या 28.5 कोटींच्या कर्जाच्या हप्त्याच्या पूर्व पेमेंटसाठी वापरले गेले.

या कर्जातून उत्तर गोव्यात 31.50 कोटी रूपये किंमतीचे 1250 चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड आणि 15300 चौरस मीटरचा भूखंड सारंग वाधवान यांनी वैयक्तिक खात्यातून खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com