ED Raids: गोव्यासह दिल्ली, नोएडात ‘ईडी’ची छापेमारी! इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह, बँक लॉकरच्या चाव्या अन् 30 लाखांची रोकड जप्त

ED Raids Bhasin Infratech: मे. भासीन इन्फोटेक ॲँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., च्या ग्रँड व्हेनेझिया कमर्शियल टॉवर्स प्रा. लि., व त्यांच्या प्रमुख कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने गोव्यासह दिल्ली व नोएडा येथील नऊ ठिकाणी छापे टाकले.
ED Raids Bhasin Infratech
ED RaidsDainik Gomantak
Published on
Updated on

ED Raids Bhasin Infratech Grand Venezia Locations In Goa Delhi Noida

पणजी: मे. भासीन इन्फोटेक ॲँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., च्या ग्रँड व्हेनेझिया कमर्शियल टॉवर्स प्रा. लि., व त्यांच्या प्रमुख कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांवर लखनौच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विभागीय पथकाने गोव्यासह दिल्ली व नोएडा येथील नऊ ठिकाणी छापे टाकले. या छाप्याच्या कारवाईवेळी अनेक संशयास्पद माहितीसह कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच विविध बँक लॉकरच्या चाव्या, ३० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आणि विविध संशयास्पद बँक खाती गोठवण्यात आली.

गौतम बुद्धनगर (नोएडा, उत्तर प्रदेश) येथील पोलिस स्थानकात भादंसंच्या विविध कलमांतर्गत दाखल झालेल्या तक्रारींच्या (एफआयआर) आधारे चौकशी सुरू करण्यात आली होती व त्या तक्रारींमध्ये तथ्य असल्याने ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील प्रमुख संशयित असलेला सतिंदर सिंग भासीन हा मे. भासीन इन्फोटेक ॲँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. या कंपनीने ग्रँड व्हेनेझिया कमर्शियल कॉम्प्लेक्स या नावाने रिअल इस्ट प्रकल्प सुरू केला होता. यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी खोटी जाहीरात देत गुंतवणुकदारांना (Investors) खोटी आश्‍वासने देण्यात आली होती.

ED Raids Bhasin Infratech
ED Raids Goa Casinos: कर चुकवेगिरी, फ्रॉड व्यवहारांची चौकशी; ईडीची उशीरा रात्री कॅसिनोत झाडाझडती

या कंपनीने गुंतवणुकदारांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना मालमत्तेचा ताबा दिला नाही व पैसेही परत न करता रक्कम लुबाडली. त्यामुळे गुंतवणुकदारांनी या कंपनीविरुद्ध पोलिसांत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्याचा तपास सुरू असताना ईडीने त्याची दखल घेत ही कारवाई केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई ईडीने (ED) सुरू करून जप्त केलेल्या दस्तावेजांची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com