ED Raid: ईडीचे डलेमनच्या मुंबई, गोव्यासह नऊ ठिकाणांवर छापे; 80 लाखांची रोकड जप्त

Enforcement Directorate Raid: डलेमन खासगी कंपनी असून कायदेशीर, ऑडिटिंग आणि कर सल्लागार अशा श्रेत्रात कार्यरत आहे.
Enforcement Directorate Raid
Enforcement Directorate RaidDainik Gomantak

Enforcement Directorate Raid

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) डलेमन रिया-आयटी ट्रेड लिमिटेड कंपनीच्या दिल्ली, मुंबई आणि गोव्यासह नऊ ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 80 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. डलेमन खासगी कंपनी असून कायदेशीर, ऑडिटिंग आणि कर सल्लागार अशा श्रेत्रात कार्यरत आहे.

पथकाने अजय हरिनाथ सिंग आणि त्याच्या साथीदारांच्या घरातून एकूण ७८ लाख रुपये भारतीय चलन, २ लाख रुपयांचे परकीय चलन, विविध डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान (पीएमएलए), 2002 पोलिसांनी ही कारवाई केली.

Dlehman Rea-IT Trade Pvt Ltd कंपनीचे हरिप्रसाद अकालू पासवान आणि रमेश यादव कुमार संचालक असून, अजय हरिनाथ सिंग यांच्या नियंत्रणाखाली आहे. दरम्यान, अजय सिंग यांच्या डार्विन कंपनीने शरद पवार यांच्याशी संबधित लवासा प्रकल्प १८०० कोटी रुपयांना खरेदी केला होता.

Enforcement Directorate Raid
Arvind Kejriwal Arrest: कथित दिल्ली मद्य घोटाळ्याचा पैसा निवडणुकीत वापरला? गोव्यातही चौकशी सुरु

दिल्ली पोलिसांनी आयपीसी, 1860 च्या कलम 420 अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ED ने तपास सुरू केला. डलेमन आणि इतरांनी 2020 मध्ये वेस्टिज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या बँकेतून 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

फसवा गुंतवणूक करार आणि बनावट प्रतिनिधी, मो. शमशुद्दीन, डलेमन रिया-आयटी ट्रेड प्रा. लिमिटेडने व्हीएमपीएलच्या बँक खात्यातून 18 कोटी रुपये हस्तांतरित केल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com