Chhattisgarh Liquor Scam: गोव्यात 'ईडी'ची मोठी कारवाई! हणजूण येथील 110 कोटींचे हॉटेल जप्त; छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्र्यांचा लेक गोत्यात

ED Attaches Hotel Westin Goa: छत्तीसगडमधील बहुचर्चित मद्य (लिकर) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे.
ED Attaches Hotel Westin Goa
Chhattisgarh Liquor ScamDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: छत्तीसगडमधील बहुचर्चित मद्य (लिकर) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याशी थेट संबंध असलेल्या उत्तर गोव्यातील हणजूण येथील ‘हॉटेल वेस्टिन’वर ‘ईडी’ने कारवाई करत मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली. या हॉटेलचे मूल्य सुमारे ११० कोटी रुपये आहे. या कारवाईमुळे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा पुत्र चैतन्य हा गोत्यात आला आहे.

ईडी’च्या रायपूर प्रादेशिक कार्यालयाने २८ मे २०२६ रोजी तीन स्वतंत्र आदेश जारी करून एकूण १ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून गोव्यातील (Goa) या प्रीमियम हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली. तपासात असे समोर आले आहे की, ‘पॅसिफिका हॉटेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’च्या मालकीचे हे हॉटेल खरेदी करण्यासाठी पूर्णपणे मद्य घोटाळ्यातील काळ्या पैशांचा वापर केला होता. हे हॉटेल राहुल अगरवाल आणि विजय कुमार अगरवाल यांच्या मालकीचे आहे.

ED Attaches Hotel Westin Goa
Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

‘ईडी’च्या आरोपानुसार, २०१९ ते २०२३ या काळात छत्तीसगडमध्ये मद्य सिंडिकेट चालवून सुमारे २,८८३ कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला होता. या सिंडिकेटचे नेतृत्व अन्वर ढेबर आणि अनिल तुटेजा (निवृत्त आयएएस) करत होते. या घोटाळ्यातील काही रक्कम रोख स्वरूपात गोव्यात आणली गेली आणि त्यातूनच हणजूण येथील हे हॉटेल खरेदी केले. या संपूर्ण प्रक्रियेत चैतन्य बघेल (छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र) यांची मुख्य भूमिका असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

ED Attaches Hotel Westin Goa
VIDEO: “आम्ही ED अधिकारी आहोत, गुपचूप आमच्यासोबत या”! भामट्यांनी केले व्यावसायिकाचे अपहरण; कारवारमध्ये नेऊन लुटले

सध्या ही मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली असून, रायपूर येथील विशेष पीएमएलए न्यायालयात याप्रकरणी पुढील सुनावणी होईल. ‘ईडी’ने या प्रकरणात सहावे पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून, आतापर्यंत एकूण ८५ जणांना आरोपी केले आहे. या घोटाळ्याशी संबंधित गोव्यातील इतर मालमत्तांचाही ‘ईडी’कडून शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com