Goa Panchayat Election : सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडीची उत्सुकता

सोमवारी प्रक्रिया; लॉबिंग वाढल्याने काही पंच सहलीवर, अनेकांची पदे निश्‍चित
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak

पणजी : राज्यातील सरपंच आणि उपसरपंचपदाची उद्या शनिवारी होणारी निवडणूक आता सोमवारी (ता.22) होत आहे. तसा अध्यादेश पंचायत संचालनालयाने यापूर्वीच काढला आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या समर्थकांसाठी लॉबिंग सुरू केले असून काही ठिकाणची पदे निश्‍चित केलीत. सर्वाधिक पंचायती बार्देश आणि सासष्टीमध्ये असल्याने तेथील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून धावपळ वाढली आहे. सोमवारी होणाऱ्या या निवडीसाठी काही पंचांना सहलीवर पाठवण्यात आले असून ते सरळ सोमवारी सकाळी पंचायतीमध्ये हजर होतील.

राज्यातील 186 पंचायतींच्या 1528 पंच सदस्यांची 12 ऑगस्ट रोजी निवड निश्चित झाली आहे. अर्थात यातील 64 जण यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडीनंतर आठ दिवसांत सरपंच आणि उपसरपंचांची निवड अपेक्षित होती. मात्र, 20 ऑगस्ट रोजी शनिवार येत असल्याने ही निवड आता 22 ऑगस्ट रोजी होत आहे. यासाठी सर्व 186 पंचायतींकरता भयमुक्त आणि शांततापूर्ण वातावरणात या निवडी व्हावेत यासाठी 186 निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ह्या निवडी होतील, अशी माहिती पंचायत संचालक सिद्धी हरळणकर यांनी दिली आहे.

Goa Panchayat Election
Land Grabbing Case : तपासाची सुई राजकीय नेत्यांकडे

70 ठिकाणी महिलाराज

186 पंचायतींपैकी 33 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे 62 पंचायतींवर सरपंचपदी महिला निवडून येतील. दक्षिण 29 तर उत्तर गोव्यात 33 ठिकाणी पंचायती महिला सरपंचसाठी राखीव आहेत. शिवाय अनेक पंचायतींवर पुरुषांपेक्षा जास्त महिला निवडून आल्यात. येथेही महिला सरपंच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 70 पेक्षा जास्त ठिकाणी महिला सरपंच असतील असा अंदाज आहे.

विरोधकांकडून आमिषांची खैरात

सरपंच, उपसरपंचपदासाठी एकापेक्षा अनेक इच्छुक असल्याने या पदासाठीचे लॉबिंग वाढले असून यासाठी मंत्री, आमदार सक्रिय झालेत. विरोधकांकडून विविध आमिषे दाखवण्यात येत असल्याने काही पंचांना गुरुवारपासूनच सहलीवर पाठविण्यात आले. ते सोमवारी सकाळी थेट पंचायतीमध्ये उपस्थित राहून निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होतील. पदांच्या निवडीसाठी लाखोंची खैरात होत आहे अशी माहिती आहे.

पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक पंचायतींमध्ये भाजप समर्थक निवडून आले आहेत. आता सरपंच आणि उपसरपंच कोणी व्हायचे, हे तेच ठरवतील. पण 140 पेक्षा जास्त पंचायतींवर आमचे समर्थक सरपंच होतील हे निश्‍चित आहे. - सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com