Goa E-Auto: दिव्यांगांसाठी ‘ई-रिक्षा’ ठरतेय लाभदायी

Goa E-Auto: गुरूप्रसाद पावसकर यांची माहिती: इतरही शहरांमध्ये लवकरच राबवणार सेवा
Goa E-Auto
Goa E-AutoDainik Gomantak
Published on
Updated on

Goa E-Auto: सेवा, सुशासन आणि जनकल्याण कार्यक्रमाचा भाग म्हणून दिव्यांगाच्या सोयीसाठी २४ एप्रिल पासून राज्यात ई-रिक्षा सुविधेचे अनावरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींचा प्रवास सुलभ करण्यासाठी राज्य दिव्यांगजन आयोग व्हीलचेअर सुलभ ई-रिक्षा सेवा सुरू केली.

Goa E-Auto
Goa Shack: शॅक व्यावसायिकांना सवलती देऊ

कामाच्या ठिकाणी, रुग्णालये, शाळा आणि इतर ठिकाणी प्रवास करताना व्हीलचेअर वापरणाऱ्यांना दिव्यांग व्यक्तींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने या सुविधेला सुरूवात करण्यात आली होती.

एका ॲपद्वारे रिक्षा बुक करावी लागते. या वाहनात दोन सदस्य दिव्यांग प्रवाशासोबत जाऊ शकतात. या रिक्षामध्ये चढताना रिक्षाचा मागचा दरवाजा रॅम्प मध्ये रूपांतरित होतो.

याशिवाय, सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व दिले असून व्हीलचेअरसाठी चारही बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे.

ही सुविधा मोफत नसली तरी दिव्यांगांना कोठे जायचे असेल, तर कोणतीच वाहतूक सुविधा उपलब्ध नव्हती, हे लक्षात घेऊन या सुविधेची सुरूवात केली आहे. एकूण ५ रिक्षा या अंतर्गत चालविल्या जात आहेत,असे पावसकर यांनी सांगितले.

राज्य दिव्यांग आयोगामार्फत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ई-रिक्षा सुविधेला दिव्यांगांद्वारे चांगला प्रतिसाद लाभत आहे. अनेक दिव्यांग जे नोकरीसाठी, शाळेसाठी, आरोग्यकेंद्रात जाण्यासाठी या सुविधेचा वापर करत आहेत. परंतु ही सेवा पणजी, पर्वरी, कोलवा, बाणावली या ठिकाणी उपलब्ध आहेत. भविष्यात ती आम्ही राज्यातील इतर भागातही सुरू करण्याचा आयोगाचा मानस आहे.

- गुरुप्रसाद पावसकर, आयुक्त दिव्यांग आयोग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com