Goa News : भ्रष्‍टाचार रोखण्यासाठी ई प्रशासन; मुख्‍यमंत्र्यांची गॅरंटी

Goa News : दक्षिण गोव्यात २० हजार लोकांशी संवाद साधल्याचा दावा
Pramod Sawant
Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News :

सासष्टी, सध्‍या गोव्‍यात भ्रष्‍टाचार वाढल्‍याच्‍या तक्रारी येत आहेत. ही गोष्‍ट जरी खरी असली तरी ती रोखण्‍यासाठी ई प्रशासनाद्वारे आम्‍ही प्रयत्‍न करत आहोत. या प्रणालीद्वारे भ्रष्‍टाचारावर अंकुश आणण्‍यासाठी आमचा पूर्ण प्रयत्‍न चालू आहे, असे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

मडगावात विकसित भारत संकल्‍प यात्रेच्‍या दरम्‍यान मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी काही नागरिकांनी सरकारी खात्‍यात जो भ्रष्‍टाचार बोकाळला आहे त्‍यावर आवाज उठविला.

तसेच मडगावातील शैक्षणिक आस्‍थापने दवर्ली येथे हलवून तिथे शैक्षणिक संकुल उभारण्‍याबाबत सरकारला जो विलंब होत आहे त्‍याबद्दल मुख्‍यमंत्री सावंत यांना विचारले असता, याबाबतही आमची प्रक्रिया सुरु असून लवकरच तोडगा काढू असे आश्‍वासन त्‍यांनी दिले.

Pramod Sawant
Goa Road : सलग दुसऱ्या दिवशीही ‘चक्काजाम’; जुने गोवे ते रायबंदर रस्ता बंद

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी दक्षिण गोव्याचा दौरा करून विकसित भारत, मोदी की गॅरंटी व संकल्प पत्र अभियानाबाबत जागृती व प्रचार केला. रात्री उशिरा मडगावात दौऱ्याचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की,

आपण दक्षिण गोव्यातील फोंडा, कुडचडे, सांगे, कुडतरी व मडगाव या पाच मतदारसंघाचा दौरा केला व दरम्यान समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील व स्तरावरील जवळ जवळ २० हजार पेक्षा जास्त लोकांकडे संवाद साधला. या दौऱ्यात आर्लेम राय येथील कार्यक्रमात ख्रिस्तीबांधवाना भाजप बरोबर राहण्याचे आवाहनही केले.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, या दौऱ्यात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारत, आत्मनिर्भर भारत व त्यांचे नारी, युवा शक्ती तसेच गरीब कल्याण बद्दलची संकल्पनाही लोकांपुढे मांडली. तसेच लोकांच्या समस्याही जाणून घेतल्या व सरकारप्रति जनतेची नेमकी काय अपेक्षा आहे हे देखील जाणून घेतले, असे ते म्हणाले.

आर्लेम राय येथील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी एसटी समाजाच्या उन्नतीसाठी कॉंग्रेसने काहीच केलेले नाही. त्यांचा केवळ उपयोग व शोषण केले. गावडा, कुणबी, वेळीप या समाजाला एसटी दर्जा देण्याचे काम केवळ भारतीय जनता पक्षाने केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसने केवळ ख्रिस्ती समाजामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल भितीचे वातावरण पसरविले व धर्मा धर्मामध्ये दुफळी माजविण्याचे कारस्थान रचले.

आपले सरकार गोव्याचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊनच काम करीत असून सरकारी, विरोधी आमदार असा भेदभाव न करता सर्वच मतदारसंघाच्या विकासावर भर दिला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कॉंग्रेसने लोकांच्या देवदर्शन यात्रेचा किंवा भाजपच्या केंद्र व राज्य सरकारने विविध लोककल्याणकारी योजना राबविल्या त्याचा आपल्या कार्यकाळात कधीही विचार केला नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक घरांमध्ये जाऊन लोकांच्या गरजा त्यांच्या समस्या समजून घेत आहेत. १० वर्षात गोव्याच्या विकास कामावर ३५ हजार कोटी रुपया खर्च केला आहे, समाज कल्याणासाठी वेगळा निधी आहे.

Pramod Sawant
Goa Shigmo Festival : फोंड्यात २६ रोजी शिमगोत्सव शोभायात्रा

कॉंग्रेस संपली...

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, कॉंग्रेस केवळ गोव्यात नव्हे तर संपूर्ण देशात संपली आहे. कॉंग्रेसचे नेते आता भाजपच्या वाटेवर आहेत. सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट (सीएए) हा कायदा, जे हिंदू, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट पाकिस्तान,

अफगाणिस्तान, बांगलादेशमधून फाळणीनंतर आपले घरदार सो़डून भारतात आले त्यांना देशाचे नागरिकत्व देण्यासाठी केलेला आहे. गेली ७५ वर्षे ते भारतात राहात आहेत पण त्यांना नागरिक या नात्याने कसलेच अधिकार मिळत नव्हते. आता ते त्यांना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोंयच्या सायबाच्या प्रदर्शनासाठी १७ कोटी मंजूर

मुख्यमंत्र्यांनी खासदार सार्दिन यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, कॉंग्रेसने पोप सायबांना कधी भारतात येण्याचे आमंत्रण दिले नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आमंत्रण दिले आहे.

भाजप सरकारने ओल्ड गोवा येथील गोंयच्या सायबाच्या प्रदर्शनासाठी खर्च केला. त्याच बरोबर २०२४ च्या प्रदर्शनासाठी १७ कोटी रुपया मंजूर केल्याचेही त्यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com