Goa Shigmo Festival : फोंड्यात २६ रोजी शिमगोत्सव शोभायात्रा

Goa Shigmo Festival : २६ रोजी दुपारी ३.३० वाजता तिस्क, फोंडा येथील सर्कलपासून मिरवणुकीला सुरवात होणार असून रात्री १० पर्यंत जुन्या बसस्थानकावरील मुख्य रंगमंचापर्यंत येऊन सांगता होणार आहे.
Goa Shigmo Festival
Goa Shigmo FestivalDainik Gomantak

Goa Shigmo Festival :

फोंडा,तालुका तालुका अंत्रूज शिमगोत्सव समितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत फोंडा तालुक्यातील सार्वजनिक शिमगोत्सवाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मंगळवार २६ रोजी फोंडा शहरात शिमगोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार २३ रोजी म्‍हार्दोळ येथील श्री महालसा देवीला नमन घालण्याचा कार्यक्रम होणार आहे.

प्रथेनुसार चित्ररथ देखावे, रोमटामेळ, लोकनृत्य अशा विविध स्पर्धा होणार असून भरघोस रक्कमेची पारितोषिकेही जाहीर करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मिरवणुकीवर वेळेचे निर्बंध राहणार आहेत.

Goa Shigmo Festival
Goa Politics: काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही गोव्याचा समावेश नाहीच

शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष कृषिमंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खडपाबांध येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत सचिव गुरुनाथ ऊर्फ भाई नाईक यांनी कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा जाहीर केली. यावेळी नगराध्यक्ष रितेश नाईक, कुर्टीचे सरपंच हरेश नाईक, समितीचे पदाधिकारी हनुमंत नाईक,

किशोर नाईक व देवानंद सतरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते. २६ रोजी दुपारी ३.३० वाजता तिस्क, फोंडा येथील सर्कलपासून मिरवणुकीला सुरवात होणार असून रात्री १० पर्यंत जुन्या बसस्थानकावरील मुख्य रंगमंचापर्यंत येऊन सांगता होणार आहे.

विविध आयोजन समित्या यावेळी जाहीर करण्यात आल्या. शनिवार १६ रोजी सायंकाळी ५ वाजता तिस्क फोंडा येथे शिमगोत्सवाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन होणार आहे. रविवार १७ ते २४ पर्यंत चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य व वेशभूषा स्पर्धेचे नावनोंदणी अर्ज स्वीकारले जातील. सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत हे कार्यालय खुले राहणार आहे.

प्रथेनुसार शिमगोत्सवाची सुरवात शनिवार २३ रोजी म्‍हार्दोळ येथील श्री महालसा देवीला नमन घालून होणार आहे. दुपारी ३.३० वाजता नमनाच्या मिरवणुकीला सुरवात होईल. रविवार २४ रोजी सायंकाळी ६ वाजता समितीतर्फे मिरवणुकीतील स्पर्धा व सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. त्यानंतर ७ वाजता मुख्य रंगमंचावर शब्दसुरांचा गंधकोष हा संगीत रजनी कार्यक्रम सादर होणार आहे.

२० लोककलाकारांचा सत्कार

सोमवार २५ रोजी सायंकाळी अंबानी हा कोकणी नाट्यप्रयोग सादर होईल. तसेच २६ रोजी होणाऱ्या शोभायात्रेच्या दिवशी मुख्य रंगमंचावर तालुक्यातील २० लोककलाकारांचा सत्कार सोहळा होणार आहे.

दुसऱ्या दिवशी बुधवार २७ रोजी सायंकाळी ७ वाजता नृत्य स्पर्धा घेण्यात येईल. वय वर्षे ६ ते १२ आणि १३ वर्षांवरील अशा दोन दोन गटात ही स्पर्धा होणार असून दोन्ही गटातील विजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात येतील.

रवींचे आवाहन

मंत्री रवी नाईक यांनी आयोजनासंबंधी काही सूचना केल्या. चित्ररथ, रोमटामेळ व लोककला पथकांनी आचारसंहितेमुळे वेळेचे निर्बंध पाळून शिमगोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

शिमगोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा असून प्रथेप्रमाणे राज्यातील शासकीय पातळीवरील शिमगोत्सवाला फोंडा तालुक्यातून सुरवात होणार आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांनी या लोकोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com