Mormugao : वास्को ते सडा मुरगाव महामार्गावर धुळीचे साम्राज्य; बॉक्साईट रस्त्यात सांडल्याने परिसर प्रदूषित

बॉक्साईटची वाहतूक रस्त्यामार्गे कर्नाटकात केली जाते
bauxite spillage on the road
bauxite spillage on the roadDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Mormugao : आयओसी जंक्शन वास्को ते सडा मुरगाव राष्ट्रीय महामार्गावर बॉक्साईट भर रस्त्यात सांडल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरून या भागातील लोकांच्या घरात घुसल्याने हा परिसर प्रदूषित झाला आहे. लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. एमपीए कडून साफसफाई नसल्याने लोकांच्या घरांत कोळशा बरोबर आता बॉक्साईटचा मारा चालू झाला आहे.

मुरगाव बंदरात 10 व 11 बर्थवर जहाजातून बॉक्साईट आले असून सदर बॉक्साईट जहाजातून उतरवून ट्रकमध्ये लोड केल्यानंतर त्याची वाहतूक रस्त्यामार्गे कर्नाटकात केली जाते.

bauxite spillage on the road
Vijai Sardesai : गोव्यात खंडणी मागण्याच्या प्रकारांना मुख्यमंत्र्यांचाच आशिर्वाद? विजय सरदेसाईंचा सवाल

दरम्यान वाढत्या प्रदूषणामुळे वास्कोत कोळसा व बॉक्साईट वाहतूक बंद करण्यात आल्याने 9 नंबर गेट मधून सदर वाहतूक न करता गेट क्र. 1 हार्बर येथून करण्यात येते. जेव्हा मुरगाव बंदरात हार्बर ब्रेक वॉटर धक्यावर पर्यटक जहाजांचे आगमन होत असते तेव्हा कोळसा व बॉक्साईट वाहतूक गेट क्र. 1 मधून आयओसी जंक्शन मार्गे जेटी, सडा मुरगाव भागातून केली जाते.

दरम्यान ट्रकमधून करण्यात येणा-या या बॉक्ससाईट व कोळसा वाहतूकी दरम्यान भररस्त्यात कोळसा व बॉक्साईटची भुकटी सांडत असल्याने येथील राष्ट्रीय महामार्ग कोळशा बरोबर बॉक्साईट मुळे लाल झालेला दृष्टीपथास पडतो.

bauxite spillage on the road
Quepem : पारोडा खून प्रकरणातील आरोपी अवघ्या 48 तासात गजाआड

या राष्ट्रीय महामार्गावर दिवसा गणीक शेकडो वाहनांची वर्दळ असते तसेच पादचा-यांचीही वर्दळ असते. तसेच या राष्ट्रीय महामार्गावर टेकडीवर शेकडो लोकवस्ती आहे. ट्रकमधून सांडत असलेला कोळसा व बॉक्साईट वाऱ्याच्या प्रवाहात लोकांच्या घरात घुसतो व याचा त्रास सहन करावा लागतो.

याचा या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनाही या धुळीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळे आजार बळावण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com