Siolim News: शिवोलीचा ‘मानकुराद’ आंबा बाजारातून झालाय गायब!

अल्‍प उत्‍पादन : मे उजाडला तरी दर्शन दुर्मीळच; सर्वसामान्‍यांना परवडेना दर; १२०० ते २००० रुपये डझन
Mango
MangoDainik Gomantak

Siolim News एकेकाळी शिवोली पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या स्थानिक मानकुराद आंबा यंदा जवळजवळ गायबच झाला आहे. पुरवठा कमी आणि मागणी मोठी यामुळे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मानकुरादचा दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही.

1200 ते 2000 रुपये डझन या दराने तो विकला जात आहे. दरवर्षी मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरूवातीला मानकुरादची एंट्री ही ठरलेली असते. परंतु यंदा मे उजाडला तरी त्‍याचे दर्शन दुर्मीळ झाले आहे, असेआंबाप्रेमी जनार्दन साळगावकर यांनी सांगितले.

शिवोली, सडये तसेच ओशेल पंचक्रोशीत एप्रिल महिन्यातच मानकुराद विक्रीसाठी उपलब्ध असायचा. पण यंदा तो अल्‍पप्रमाणात उपलब्‍ध आहे.

Mango
Ponda Municipal Election: फोंड्यात भाजप-मगोची सत्त्‍वपरीक्षा!

रासायनिक खतांचा मारा, झाडांची कत्तल कारणीभूत

शिवोलकरांच्या आहारातून लोकप्रिय मानकुराद आंबा गायब होण्‍याची कारणे अनेक आहेत. आंब्याच्या वाढीव उत्पन्नासाठी झाडावर होणारा रासायनिक खतांचा मारा तसेच औषधांची बेसुमार फवारणी त्‍याचे मुख्‍य कारण आहे, असे ओशेल-शिवोली येथील आंबाव्यावसायिक बबिता सावळ यांनी सांगितले.

दुसरे कारण म्‍हणजे विकासाच्‍या नावाखाली नवनवीन इमारती तसेच रहिवाशी प्रकल्पांच्या उभारणीसाठी आंब्‍यांची झाडांची बेसुमार कत्तल होत आहे. त्‍यामुळेच शिवोली परिसरातून मानकुराद आंबा गायब झाल्‍याचे बोलले जातेय.

एकेकाळी ‘शिवोलीचा किंग’ असलेल्या मानकुराद आंब्‍याची जागा आता वेंगुर्ल्यातील हापूस आंब्याने घेतली आहे. स्थानिक लोक आपल्या आवडत्या मानकुरादची चव हापूसमध्ये शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ही गोष्ट कुठल्याही परिस्थितीत मनाला पटत नाही. मानकुराद आंबा तो मानकुरादच.

- राजेश धारगळकर, आंबा व्यावसायिक (शिवोली)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com