फार्मागुडीत कंटेनरचा भीषण अपघात, बायपास रोडवरील वळणे बनली मृत्यूचा सापळा

या तीक्ष्ण वळणांमुळे बायपास रोडचा तीन किलोमीटरचा भाग अपघात क्षेत्र बनला आहे.
Due to the sharp turns, the bypass road in Ponda has become an accident prone area
Due to the sharp turns, the bypass road in Ponda has become an accident prone areaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ढवळी-फार्मगुडी राष्ट्रीय महामार्ग बायपास रस्त्यावरील तीक्ष्ण वळणे दुरुस्त करण्याची मागणी फोंडा स्थानिकांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. या तीक्ष्ण वळणांमुळे बायपास रोडचा तीन किलोमीटरचा भाग अपघात क्षेत्र बनला आहे. (Due to the sharp turns, the bypass road in Ponda has become an accident prone area)

Due to the sharp turns, the bypass road in Ponda has become an accident prone area
पणजी शहराच्या हिरवाईने नटलेल्या सैंदर्याला सिमेंटच्या जंगलाचे गालबोट

फोंडा (Ponda) शहरातील गर्दी कमी करण्यासाठी दहावर्षापूर्वी, फोंडा-मडगाव राष्ट्रीय महामार्गावर ढवळी-फार्मगुडी बायपास रस्ता बांधण्यात आला होता, ज्यामुळे फोंडा शहरातील वाहतूक कमी होउन सुरळीत झाली. अपघाताचे प्रमाणही कमी झाले. मात्र, ढवळी-फार्मगुडी बायपास रस्ता बांधताना काही राजकीय लोकांच्या रस्त्यालगतच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तीन किलोमीटरचा रस्ता (Ponda Bypass Road) अनेक तीव्र वळणांनी बांधण्यात आला आहे. चार वर्षांपूर्वी रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर ढवळी-फार्मगुडी रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. काशीमुट जंक्शनवर तीव्र वळण असलेल्या फार्मगुडी उतारावरील स्पीड ब्रेकरवरून एका क्रेनचे नियंत्रण सुटल्याने तो उड्डाणपुलावरून खाली पडला. या अपघातात चालकाला आपला जीव गमवावा लागला होता.

रस्त्याचे उद्घाटन होण्यापूर्वीच बांदोरा ग्रामपंचायत ग्रामसभेत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, परंतु संबंधित अधिकाऱ्यांना प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी नाही.

स्थानिकांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांना सदोष डिझाइनसाठी जबाबदार धरले असुन, वारंवार अपघात होऊनही त्यांनी या अपघात प्रवण तीक्ष्ण वळणाच्या सुधारणेसाठी कोणतीही ठोस पाउले उचलली नाहीत. असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com