दवर्ली पंचायतीजवळ असलेल्या रायकर यांच्या घराला सोमवारी सकाळी (19 ऑगस्ट) भीष आग लागली. दरम्यान अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सव्वासात वाजता तेरेझा रायकर यांच्या घराच्या वरच्या बाजूला टेरेसवरील रुमला आग लागली. यावेळी रायकर कुटुंबीय मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी करत असताना घराच्या वरच्या बाजूला असलेल्या भागाला आग लागलेली दिसून आली. त्यांनी घरातील वीज तात्काळ बंद केली. याचवेळी घराच्या वरील भागातून स्फोट झाल्याचा मोठा आवाज आला व तेथील सामानाने पेट घेतला. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, या आगीत सदर खोलीतील वॉशिंग मशिन, मुलांचे अभ्यासाचे साहित्य, उभारलेली शेड व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. तेरेझा रायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वीच टेरेसवर शेडचे बांधकाम करत नव्याने वीजवाहिनीची जोडणी करण्यात आली होती. यात सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त नुकसान झालेले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अग्निशामक दलाने अद्याप अंदाजपत्रक तयार केलेले नाही. घटनेची माहिती मिळताच मायना कुडतरी (Maina Curtorim) पोलिसही घटनास्थळी पोहोचले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.