Kulem Dudhsagar Jeep Tour Association to Protest Against Government Inaction
कुळे: आपल्या मागण्यांवर कोणताही तोडगा सरकारने न काढल्याने कुळे दूधसागर जीप टुर ऑपरेटर्स संघटनेने सरकारच्या निषेधार्थ आजपासून (शनिवार, २ नोव्हेंबर) साखळी उपोषणाला सुरूवात केली.
या संदर्भात अध्यक्ष नीलेश वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार दरबारी आमच्या अनेक बैठका झाल्या. सरकार योग्य निर्णय देणार,अशा अपेक्षा बाळगून आम्ही अनेक दिवस प्रतीक्षा केली. मात्र एवढे करूनही आपल्या मागण्यांवर कोणताही तोडगा काढण्यात सरकारला यश आले नाही. त्यामुळे कुळे दूधसागर जीप टुर ऑपरेटर्सच्या वतीने आम्ही सरकारच्या निषेधार्थ साखळी शनिवारपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दूधसागर जीप ऑपरेटर्सची मागणी आहे की, सरकारने बुकिंग शुल्क वाढवल्यामुळे त्यांचे ग्राहक कमी झाल्याचा दावा करत गोवा पर्यटन विकास महामंडळ यांनी चालू केलेला ऑनलाइन बुकिंग काउंटर बंद करावे, तसेच आमची वेबसाईट आम्हाला परत द्यावी, अशी मागणी करणारी निवेदने मुख्यमंत्र्यांकडे दिली. त्यानंतर अनेक बैठका झाल्या, पण त्यातून तोडगा निघाला नाही. आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वळावे, यासाठी आम्ही साखळी उपोषण करणार आहे.
प्राप्त माहितीप्रमाणे उद्या कुळे पर्यटन हंगाम चालू करण्यासाठी काही जीप मालकांना हाताशी धरुन मोले येथे गुप्त बैठक झाली आहे. या बैठकीत शनिवारी पर्यटन हंगाम चालू करण्यासाठी चर्चा केली. पण या चर्चेत मात्र, कुळे दूधसागर जीप टुर ऑपरेटर्स यांना बोलावण्यात आले नाही.
दूधसागर जीप टुर ऑपरेटर्स व गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्यात ऑनलाइन बुकिंगच्या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या वादामुळे कुळे मधील दूधसागर धबधब्याच्या पर्यटनाला विलंब झाला आहे, त्यामुळे शिगाव,कुळे आणि मोले पंचायतींमध्ये दिवाळीचा उत्साह ओसरला आहे. स्थानिक लोक, त्यांच्या उपजीविकेसाठी पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेले, हॉटेल, चहाचे स्टॉल आणि जेवण देणाऱ्या आस्थापनांसह त्यांच्या व्यवसायांना मोठा फटका बसला आहे.
मोजक्याच काही जीप मालकांनी मोलेहून धबधब्यापर्यंत जीप सोडाव्यात, असे गुप्त बैठकीत सांगितले गेले. त्यासंदर्भात रस्त्याची पहाणीही झाली असल्याचीही माहिती मिळाली. कुळे संघटनेला डावलून ही बैठक मोले येथे झाली, पण या बैठकीची चर्चा मात्र कुळे गावात पसरली असून स्थानिक लोकप्रतिनिधींविरूध्द लोक बोलू लागले आहेत. संघटनेला डावलून उद्या हंगाम चालू केला तर या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.