Aasgao Truck Fire: आसगाव येथे भर रस्त्यात बर्निंग ट्रकचा थरार, मडगावनंतर दुसरी आगीची घटना

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
Aasgao Truck Fire
Aasgao Truck FireDainik Gomantak
Published on
Updated on

Aasgao Truck Fire: मडगाव येथील रावणफोंड मिलिट्री कॅम्प जवळ आज (दि.19) सकाळी एका घराला आणि काही दुकानांना आग लागली. आगीचे प्रचंड लोळ हवेत जात असतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या आगीत 50 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मडगावनंतर आसगाव येथे एका धावत्या ट्रकमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. वीज केबलची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील (क्र: जीए-03 के-9603) केबल रीळचा संम्पर्क तेथील जीवंत वीज वाहिन्यांनी आल्याने अचानक आग लागली.

Aasgao Truck Fire
Goa Water Problem: अपुऱ्या पाणीपुरवठ्या मुळे हणजूणवासीय त्रस्त!

आसगाव येथे एका ट्रकमधून वीज केबलची वाहतूक केली जात होती. केबल रीळचा ओव्हरहेड वीज वाहिन्यांशी संपर्क झाल्यामुळे ट्रकमधील केबलला आग लागली. याभागात ड्युटीवर असलेल्या हणजुण वाहतूक पोलिस कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखीत रस्त्यातून जाणारे खाजगी पॉकलेन थांबविले व त्याच्याच सहाय्याने ट्रकमधील भलीमोठी वीज -केबलची जळती रीळ ट्रकमधून खाली पाडली यामुळे मोठा अनर्थ टळला. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Aasgao Truck Fire
Terrible fire irrupts in Goa: मडगावात अग्नितांडव; 3 घरांसह 4 गाड्या आगीत भस्मसात

दरम्यान, शिवोली पंचक्रोशीत सध्या भुमीगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम यूद्धपातळीवर सुरू असून येथील कामासाठीच या वीज केबल्स नेण्यात येत होत्या असे कळते. हणजुण पोलिस वाहतूक कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून दोन्ही बाजुंकडील वाहतूक कांहीं काळासाठी थोपवून धरली व रस्त्यात कांहीं अंतरावर उभ्या असलेल्या पॉकलेनच्या आॉपरेटरशी विनवणी करीत ट्रकमधील भलेमोठे केबलचे जळते रीळ ट्रकमधून खाली पाडण्याच्या कामात पुढाकार घेतला.

तसेच, शनिवारी सकाळी रावणफोंड मिलिट्री कॅम्प जवळ लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत घरासह तीन दुकाने आणि चार वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथम प्रतत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com