मद्यधुंद गुजराती पर्यटक महिलेचा सर्व्हिस रोडवर धिंगाणा

महिलेने दिली स्कूटरला धडक, वाहन दामटत या पर्यटकांचा पळ काढण्याचा प्रयत्न
Drunken Gujarati tourist Woman accident on Service Road
Drunken Gujarati tourist Woman accident on Service RoadDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना वेर्णा येथे एका स्कूटरला धडक देऊन महिलेला जखमी करून पळून जाणाऱ्या एका पर्यटक महिलेला (Tourist Women) शेवटी आगशी येथे पकडले. या महिलेचे नाव श्वेता शहा असून, ते गुजरातहुन गोव्यात पर्यटनास आले होते, अशी माहिती वेर्णा पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी शरयू टोयोटा मोटर्सजवळ दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला. या वाहनात तीन पुरुष आणि दोन महिला असे पाच जण होते. श्वेता ही वाहन चालवीत होती. शरयू मोटर्स जवळ एका दुचाकीला ओव्हरटेक करताना या वाहनाचा धक्का लागून दुचाकीस्वार खाली पडून एक महिला जखमी झाली. पण तिची विचारपूस करण्यासाठी ती तिथे न थांबता वाहन दामटत या पर्यटकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. हा अपघात होताना पाहणाऱ्या काही प्रत्यक्षदर्शीनी हे वाहन भरधाव वेगात होते, अशी माहिती दिली.

Drunken Gujarati tourist Woman accident on Service Road
Goa: धारगळ दोन खांब; सुशोभीकरण की कचरा दर्शन ?

अपघात करून पळून जात असलेल्या या पर्यटकांना अडविण्यासाठी वेर्णा पोलिसांनी जवळच्या आगशी पोलिसांना सतर्क केले असता आगशी पोलिसांनी हे वाहन आगशी सर्व्हिस रोडवर अडविली तेव्हा चालक महिलेने तिथेच धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. ही महिला मद्यधुंद अवस्थेत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Drunken Gujarati tourist Woman accident on Service Road
Goa Accident's: हे तर उशीरा सुचलेलं शहाणपण

त्यानंतर त्या पाचही जणांना ताब्यात घेऊन वेर्णा येथे आणण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंद केला असल्याची माहिती वेर्णाचे पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत हे पर्यटक बाहेरच्या बाहेर हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करत होते, अशी माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com