पणजी: गेल्या अडीच वर्षात पोलिस खात्याच्या विविध विभागाने सुमारे 15 कोटी रुपयांचा अंमलीपदार्थ जप्त केला आहे. 424 अंमलीपदार्थाचे गुन्हे नोंद झाले असून 471 जणांना अटक झाली आहे. त्यामध्ये 368 देशी व 103 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. या काळात 285 किलो विविध प्रकारचा ड्रग्ज पोलिसांनी संशयितांकडून जप्त केला आहे त्यामध्ये गांजाचा अधिक समावेश आहे.
2019 ते 2021 या काळात उत्तर गोवा, दक्षिण गोवा, अंमलीपदार्थविरोधी कक्ष व क्राईम ब्रँच या विभागानी राज्यातील ड्रग्ज दलाल तसेच विक्रेत्यांचा कणा मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे. 2021 मध्ये राज्यात आतापर्यंत 56 प्रकरणे नोंद झाली असून 57 नागरिकांना अटक झाली आहे. त्यामध्ये 49 देशी व 8 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. 50 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 1 कोटी 17 लाख 50 हजार 100 आहे. 2020 मध्ये 148 अंमलीपदार्थाची प्रकरणे नोंद होऊन 172 जणांना अटक झाली होती. त्यात 136 देशी व 36 विदेशी नागरिक आहेत. 150 किलो ड्रग्ज जप्त केला असून, त्याची किंमत 7 कोटी 8 लाख 52 हजार 50 रुपये आहे.
2019 ते 2021 सालातउत्तर गोव्यात प्रकरणे जास्त
2019 ते 2021 पर्यंत उत्तर गोव्यात सर्वाधिक अंमलीपदार्थाची प्रकरणे नोंद झाली आहेत. मध्ये 200 हून अधिक प्रकरणांची नोंद झाली; मात्र 2020 हे प्रमाण कमी होऊन 150 वर आले. यावर्षी राज्यात कोरोना महामारीमुळे टाळेबंदी झाल्याने पर्यटक गोव्यात येऊ शकले नव्हते तसेच पर्यटन व्यवसाय बंद असल्याने अंमलीपदार्थाचा व्यवसाय थंडाच राहिला. यावर्षीही आतापर्यंत पन्नासच्या आसापास प्रकरणे नोंद झाली आहे. पोलिस खात्याच्या विविध विभागामार्फत ड्रग्ज दलाल तसेच किरकोळ विक्रेत्यांवर नजर असल्याने हे प्रमाण घटले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अडीच वर्षातील पोलिस विभागांची कामगिरी
विभाग प्रकरणे अटक ड्रग्ज किंमत
उत्तर गोवा 188 218 18 किलो 8 कोटी
दक्षिण गोवा 129 136 33 किलो 58 लाख
एएनसी 64 69 78 किलो 5.5 कोटी
क्राईम ब्रँच 39 46 50 किलो 93 लाख
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.