Calangute Crime News: रविवारी मध्यरात्री कळंगुट पोलिस पथकाकडून ओर्डा -कांदोळी येथील एका विदेशी महिलेच्या राहत्या घरांवर सापळा रचून घातलेल्या धाडीत अंदाजे 12 लाख 12 हजार 800 रुपयांचा विविध प्रकारचा मादक पदार्थ जप्त करण्यात आला. (Calangute Crime News Updates)
दरम्यान, यासंदर्भात संशयित प्रिसीला अड्जेते (37) या घाना देशाच्या नागरिक असलेल्या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची रवानगी स्थानिक पोलिस कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी दिली. दरम्यान, ओर्डा-कांदोळी येथील एका भाड्याच्या घरात भाडोत्री म्हणून राहाणाऱ्या विदेशी महिलेचा अमली पदार्थ प्रकरणात सहभाग असल्याची माहिती गुप्त सुत्रांकडून पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार कळंगुट पोलिस (Police) स्थांकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर तसेच त्यांच्या सहकारी पथकाने सापळा रचून घरांवर धाड घातली असता हेरॉईन 33 ग्राम, कोकेन 35 ग्राम, चरस 35 ग्राम तसेच एक्टासी 8 ग्राम याप्रमाणे विविध प्रकारचा मादक पदार्थ मिळून अंदाजे 12 लाख 12 हजार 800 रुपयांचा (आंतरराष्ट्रीय बाजार किंमत) अमली पदार्थ जप्त केला.
कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या सोबतीने उप-निरीक्षक राजाराम बागकर, हेड-कॉन्स्टेबल विद्या आमोणकर, कॉ. भगवान पालयेंकर, गणपत तिळोजी, फ्रांन्सिस फर्नाडीस, आमीर गरड, आकाश नाईक, महेंद्र च्यारी तसेच चालक सुनील म्हाळशेंकर यांनी या कारवाईत भाग घेतला. दरम्यान, संशयित महिला प्रिसीला यांच्या विरोधात कळंगुट पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार रितसर गुन्हां दाखल करण्यात आला असून उप-अधिक्षक विश्वेष कर्पे तसेच उत्तर गोवा पोलिस अधिक्षक शोबीत सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखालीी पुुढील तपास जारीी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.