डार्क नेटद्वारे ड्रग्ज तस्करी; मुंबई, गोवा, दिल्लीत विक्रीसाठी आणलेले 1 कोटींचे अमली पदार्थ जप्त, नाजेरियनला अटक

एनसीबीने या प्रकरणी नाजेरियन व्यक्ती जॉन संडे याला अटक केली आहे.
Drugs Ordered Via Darknet
Drugs Ordered Via Darknet
Published on
Updated on

डार्क नेटद्वारे अमली पदार्थ तस्करीची एक घटना समोर आली आहे. केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने विदेशातून आलेले तब्बल एक कोटी रूपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या अमली पदार्थांची तस्करी पुढे मुंबई, दिल्ली आणि गोव्यात केली जाणार होती अशी माहिती समोर आली आहे. एनसीबीने या प्रकरणी नाजेरियन व्यक्ती जॉन संडे याला अटक केली आहे.

केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एनसीबीला डार्क नेटद्वारे अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने त्यानुसार मुंबईतील आंतरराष्ट्रीय पोस्ट ऑफिसवर लक्ष ठेवले होते. 20 जून रोजी नेदरलँडवरून आलेल्या एका पार्सलची माहिती पथकाला मिळाली, पथकाने त्याची तपासणी केली असता त्यात अमली पदार्थ आढळून आले.

यामध्ये 996 ग्रॅम वजनाच्या 2,000 एमडीएमए टॅबलेट आढळून आल्या, त्याची बाजारातील किंमत एक कोटी असल्याचे सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या जॉन या व्यक्तीने या पार्सलची मागणी केल्याची माहिती पथकाला मिळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. जॉनच्या घरी तपासणी केली असता त्याच्या जवळ बनावट भारतीय पासपोर्ट आणि त्यावर त्याचा फोटो चिटकल्याचे आढळून आले.

Drugs Ordered Via Darknet
Mapusa: शेट्येवाडा म्हापसा येथे विहिरीची भिंत कोसळली ; दुचाकी बुडाली, घर धोक्यात

अटक केलेल्या जॉनची चौकशी केली असता त्याने पार्सलद्वारे मागवलेले अमली पदार्थ दिल्ली, गोवा, मुंबई येथे तस्करी करण्याच्या उद्देशाने मागवले असल्याची कबुली दिली. तसेच, आगामी उत्सवाच्या काळात त्याची विक्री करण्याचा त्याचा मानस होता. कडक सुरक्षा आणि सापडले जाणार या भितीने त्याने थोड्याच प्रमाणात अमली पदार्थ मागवल्याचे सांगितले.

धक्कादायक बाब म्हणजे जॉनला 2021 मध्ये देखील अटक करण्यात आली होती पण, तो जामीनावर बाहेर होता. याचा देशातील अमली पदार्थ तस्कारीचे जाळे याच्याशी काही संबंध आहे का याचा तपास पथक करत आहे.

दरम्यान, जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ डार्कनेट-आधारित बाजारातून खरेदी करण्यात आले होते, याचे पेमेंट देखील क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa drug case accused acquitted due to investigation error
mla vijai sardesai slams goa govt
Goa Drug Case:
Goa customs hydroponic ganja seizure
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com