Drugs Accused Arrested by Colvale Police: गोवा पोलिसांनी ड्रग्ज विरोधी कारवाईचा जोर वाढवला असून सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीच्या आधारे राज्यभरात छापे टाकायला सुरुवात केली आहे. कोलवाळ पोलिसानी या प्रकरणात दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून अमली पदार्थ जप्त केले आहेत.
माहितीनुसार, आज (20 ऑक्टोबर) मध्यरात्री टाकलेल्या छाप्यामध्ये कोलवाळ पोलिसांनी अमित सोंकर (21, गणेश नगर) आणि दिनेश सोनी (27, खडपावडा, कुचेली) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 1,500,00 लाख किमतीचा दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याचसोबत त्यांची डिओ स्कूटर (GA-03-AN-1101) देखील ताब्यात घेतली.
शिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेले Redmi आणि Vivo कंपनीचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत.
कोलवाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय राणे, पोलीस उपनिरीक्षक रोहन मडगावकर, पोलीस उपनिरीक्षक कुणाल नाईक, हेड कॉन्स्टेबल रुपेश कोरगावकर आणि पांडुरंग नाईक तसेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप मलिक, रोहन शिवोलकर आणि पोलीस जगदीश ठाकुर यांचा या छाप्यामध्ये सहभाग होता.
दरम्यान पोलीस निरीक्षक रोहन मडगावकर हे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.