ड्रग्ज विक्रेता टायगर मुस्तफा गजाआड; एनसीबी गोवाची कारवाई 

Drug dealer Tiger Mustafa arrested in joint operation NCB Mumbai and Goa
Drug dealer Tiger Mustafa arrested in joint operation NCB Mumbai and Goa
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) संयुक्तपणे काल मध्यरात्री हणजूण येथील ‘कॅजे इन’ या हॉटेलात लपलेल्या ड्र्ग्ज विक्रेता टायगर मुस्ताफा या नायजेरियन नागरिकाला अटक केली. तसेच त्याला लपण्यास मदत केल्याप्रकरणी हॉटेल मालकालाही अटक केली आहे. या दोघांनाही पोलिस कोठडी घेण्यासाठी आज म्हापसा येथील न्यायालयात उभे करण्यात येणार असल्याची माहिती गोव्याच्या एनसीबी विभागाचे प्रमुख व पोलिस अधीक्षक एस. के. सिंग यांनी दिली. 

अधीक्षक सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 30 एप्रिलला रात्रीच्यावेळी हरमल येथे घातलेल्या छाप्यावेळी ड्रग्ज माफिया टायगर मुस्तफा हा निसटला होता. मात्र या घातलेल्या छाप्यावेळी विविध प्रकारचा ड्रग्ज जप्त करण्यात आला होता. त्यामध्ये एलएसडी पेपर्स, कोकेन, हेरॉईन, गांजा तसेच इतर प्रकारचा ड्रग्ज सापडला होता. या ड्रग्जची किंमत लाखोच्या किंमतही होती. तो निसटल्यापासून एनसीबीचे अधिकारी त्याचा शोध घेत होते. संशयित टायगर मुस्तफा हा हणजूण येथील एका हॉटेलात असल्याची माहिती मिळाल्यावर काल रात्री या हॉटेलात गोवा एनसीबीच्या विभागाने छापा टाकून त्याला गजाआड करण्यात आले.

या हॉटेलात रात्रीच्या सुमारास छापा टाकण्यात आला तेव्हा हॉटेल मालकाने संशयित टायगर मुस्तफा याच्यासंदर्भात माहिती उघड केली नाही व त्या नावाची व्यक्ती हॉटेलात नसल्याचे सांगितले. एनसीबीच्या पथकाने या हॉटेलची पूर्ण झडती घेतली असता संशयित मुस्तफा सापडला. मालकाने मुस्तफा याला लपवण्यास मदत केली तसेच त्याने माहिती उघड न केल्याने अटक करण्यात आल्याचे अधीक्षक सिंग यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.