Drowning Death: सांगेत दुर्दैवी घटना! 24 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू, अनेक दिवसांपासून होता बेपत्ता

24 Year Old Youth Drowning: सांगे तालुक्यातील बेंदवाडा पुलाखाली शनिवारी दुपारी एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
Drowning Death
Drowning DeathDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सांगे तालुक्यातील बेंदवाडा पुलाखाली शनिवारी दुपारी एका २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत तरुणाची ओळख खाजा मोहिदीन चोपदार अशी पटली असून तो बेंदवाडा - सांगे येथे वास्तव्यास होता. त्याचे मूळ गाव कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सांगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै दुपारी १२.५९ वाजण्याच्या सुमारास रामाजाबी चोपदार यांनी सांगे पोलिस स्थानकात संपर्क साधून बेंदवाडा पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसत असल्याची माहिती दिली.

Drowning Death
Goa Private Forest Survey: खासगी वन सर्वेक्षण कामाला वेग, पुढील महिन्याअखेरपर्यंत अंतिम अहवाल तयार होण्याची शक्यता

रामाजाबी चोपदार या बेंदवाडा - सांगे येथे वास्तव्यास असून त्यांचे मूळ गाव कर्नाटकातील हावेरी आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत पाण्यात दिसणारा मृतदेह हा काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या त्यांच्या मुलाचा असण्याची शक्यता व्यक्त केली. माहिती मिळताच सांगे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचांसमक्ष पाहणी केली.

Drowning Death
Goa Section 39A: कलम '39ए' चे भूत सत्ताधीशांच्या मानगुटीवर बसेल!

दरम्यान, कुडचडे अग्निशमन दलाच्या जवानांनी आवश्यक खबरदारी घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मृतदेहाची पाहणी केल्यानंतर रामाजाबी चोपदार यांनी तो आपल्या मुलगा खाजामोहिदीन चोपदार याचाच असल्याचे ओळखले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com