Urrak Feni Production: हुर्राक, फेणी गाळप घटले; व्यावसायिक हवालदिल, बोंडू उपलब्ध होत नसल्याने परिणाम

Urrak Feni Production: फेणी, हुर्राक गाळप कमी झाल्याने दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Kaju Feni
Kaju FeniDainik Gomantak

Urrak Feni Production

राज्यात यंदा काजूचे पिकात कमालीची घट झाली आहे, त्याचा परिणाम फेणी, हुर्राक गाळपावर झाला आहे. त्यामुळे व्यावसायिक हवालदिल झाले आहे. दरम्यान, फेणी, हुर्राक गाळप कमी झाल्याने दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बोळकर्णे, साकोर्डा येथील हरिश्चंद्र खांडेपारकर यांचे वडील स्व. गोपाळ खांडेपारकर यांनी १९७० साली काजू फेणी, हुर्राक गाळप प्रक्रियेला परिसरात सर्वप्रथम सुरुवात केली होती. फेणी व्यावसायिक म्हणून परिचित होते.

त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरिश्चंद्र व बंधू मंगलदास यांनी संयुक्तपणे हा व्यवसाय चालू ठेवला. परंतु या वर्षी हवामान बदलामुळे काजू पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे काजू उत्पादकही संकटात आले आहेत.

पुरेसे बोंडू उपलब्ध होत नसल्याने फेणी, हुर्राक गाळप व्यवसायही अडचणीत आला आहे, हरिश्चंद्र खांडेपारकर यांनी सांगितले.

खांडेपारकर म्हणाले की, गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी अजूनपर्यंत ५ टक्के देखील गाळप झालेले नाही. गेल्या वर्षी या महिन्यात काजूचे साधारण पीक आले होते, त्यामुळे बोंडू आणण्यासाठी दिवसांतून तीन वेळा फेऱ्या माराव्या लागत होत्या.

Kaju Feni
Heatwave Alert: गोव्यात समुद्र किनाऱ्यावर जाताय? थेट ऊनाचा संपर्क टाळा, भरपूर पाणी प्या, सनस्क्रीन वापरा

तरीही बोंडू शिल्लक राहत. सध्या दोन दिवसातून एक फेरी होते. त्यामुळे दिवसाला एक भट्टी लावणेही कठीण झाले आहे. दर वर्षी या दिवसांत आपण दिवसाला चार भट्ट्या लावत होतो, असे ते म्हणाले.

२० डिग्रीच्या फेणीला मागणी

१९.२० डिग्रीपर्यंतची फेणी पिण्यास योग्य असते, परंतु २० डिग्री फेणीला ग्राहकांची जास्त मागणी असते. ही फेणी अधिक कडक असते. हुर्राक हे १२-१५ डिग्रीचे असल्याने त्याची नशा अगदी कमी असते, असे खांडेपारकर यांनी सांगितले.

स्थानिक मजूर मिळेनात : खांडेपारकर

गाळप भट्टीवर काम करण्यास सध्या स्थानिक मजूर मिळत नाहीत, त्यामुळे परप्रांतीय मजुरांवर अवलंबून राहावे लागते. गेल्या तीन महिन्यांपासून भट्टीवर काम करण्यासाठी झारखंडचे दोन मजूर कामावर ठेवले आहेत, असे खांडेपारकर यांनी सांगितले.

यंत्राच्या सहाय्याने बोंडूचे रस गाळप होत असल्याने आता काम सुलभ झाले आहे. शिवाय वेळेचीही बचत होते. तसेच चांगल्या प्रतिचा बोंडूचा रस मिळत असल्याने फेणी, हुर्राक गाळपही योग्य प्रकारे होते. गाळपासाठी लाकडेही कमी लागतात, असे हरिश्चंद्र खांडेपारकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com